विशेष प्रतिनिधी
नागपूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या पुराला अटकाव करण्यासाठी, तिथला पूर निवारण करण्यासाठी जागतिक बँकेने तब्बल 280 दशलक्ष डॉलर्सची मदत महाराष्ट्राला दिली आहे, त्याचबरोबर राज्यांकडून 120 दशलक्ष डॉलर्स उभे करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. Fadnavis thanked the Prime Minister
या मोठ्या मदतीमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरामुळे जे प्रचंड नुकसान होते, ते नुकसान तर वाचेलच, शिवाय तिथल्या अतिरिक्त पाण्याचा विनियोग मराठवाड्याच्या दुष्काळ निवारणासाठी देखील होऊ शकेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला
कोल्हापूर आणि सांगली येथील पूर निवारणासाठी 400 दशलक्ष USD च्या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि जागतिक बँकेचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
या प्रकल्पात, $280 दशलक्ष जागतिक बँक आणि राज्यांकडून $120 दशलक्ष योगदान देण्यासाठी वित्तपुरवठा केला जाईल. पुराच्या काळात अतिरिक्त पुराचे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळवण्याच्या संधी आम्ही शोधू. या एकाच प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला फायदा होणार आहे. MITRA जलसंपदा, कृषी आणि R&R आपत्ती व्यवस्थापनाच्या अनेक विभागांमध्ये अंमलबजावणी आणि समन्वयाचे नेतृत्व करेल.
Fadnavis thanked the Prime Minister
महत्वाच्या बातम्या
- बांगलादेशात शेख हसीनांचे सत्तेत पुनरागमन, पाचव्यांदा पंतप्रधान म्हणून निवड!
- INDIA आघाडीत फूट? जागावाटप झालेले नसताना केजरीवालांकडून उमेदवाराची घोषणा
- “जुना भारत” समजून खेळायला गेले कुस्ती; मोदींच्या नव्या भारताने उतरवली मालदीवची मस्ती!!
- टीएमसी नेत्याविरोधात जारी केलेल्या लुकआउट नोटीसीवरून काँग्रेसची खोचक टिप्पणी