विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. त्याची खंत आपल्या मनात एकच दिवस राहिली, नंतर आपण त्या पदावरून देखील सुरळीत काम करू लागलो, असे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रशंसारुपी शिक्कामोर्तब केले. Fadnavis runs the good governance in Maharashtra by holding the post of Chief Minister or Deputy Chief Minister
लोकमतला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रीपदासंदर्भात विस्ताराने भाष्य केले.
– नरेंद्र मोदी म्हणाले :
– भाजप कार्यकर्त्यांचा आणि केडर बेस पक्ष आहे. तिथे पक्ष जे काम सांगतो ते कार्यकर्ता करतो. ही आमच्या पक्षाची ओळख आहे. भाजपने ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळायला सांगितले, त्यावेळी त्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. महाराष्ट्राचे सुशासन चालवले. महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली. सबका साथ सबका विकास हेच धोरण त्यांनी महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवले.
मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे बऱ्याच वर्षांनंतरचे यशस्वी मुख्यमंत्री ठरले. पण भाजपने आता त्यांना दुसरी जबाबदारी दिली. ती जबाबदारी पण फडणवीस उत्तम पद्धतीने पार पाडत आहेत. महाराष्ट्रात सुशासन राखणे ही फडणवीसांची जबाबदारी आहे. मग ते मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री, यापेक्षा ते महाराष्ट्रात सुशासन राखत आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.
– भाजपची राजकीय संस्कृती ही आहे की, ज्याला जी जबाबदारी दिली जाईल, ती त्याने उत्तमपणे पार पाडावी. देवेंद्र फडणवीस तेच करत आहेत.
Fadnavis runs the good governance in Maharashtra by holding the post of Chief Minister or Deputy Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- 10 राज्यांतील 96 जागांवर उद्या मतदान; 5 केंद्रीय मंत्री, दोन माजी क्रिकेटपटू रिंगणात; तसेच 5700 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत उमेदवारही
- ठाकरे + पवारांचे माध्यमी नॅरेटिव्हचे बाऊन्सर्स; पण त्यावर फडणवीसांची सभांची सेंच्युरी!!
- रिलायन्स कॅपिटल झाले हिंदुजा समूहाचे, ‘IRDAI’नी दिली मंजुरी!
- इंदूरमध्ये काँग्रेस का मागत आहे NOTAसाठी मतं?