विनायक ढेरे
सार्वजनिक गणेशोत्सवात सर्वसामान्यांच्या उत्साहाला जसे उधाण येते, तसेच उधाण 2022 च्या गणेशोत्सवात महाराष्ट्राच्या राजकारणालाही आले आहे!!, मात्र ते नेत्यांच्या भेटीगाठींचे आणि (न)राजकीय चर्चांचे आहे!! Fadnavis – Ashok Chavan meeting coordinated by Ashish Kulkarni
सगळे नेते एकमेकांकडे गणपती दर्शनाच्या निमित्ताने जाऊन सौजन्य भेटीतून (न)राजकीय चर्चा करत आहेत. या चर्चेला (न)राजकीय चर्चा म्हणण्याचे कारण असे की एकमेकांना भेटलेले प्रत्येक नेते आमच्यात कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचा निर्वाळा देत आहेत आणि नेत्यांचा (न)राजकीय (अ)प्रामाणिकपणा पाहता तसे (अ)मान्य करणे आपल्याला भाग आहे!!
राज ठाकरे भेटीचा सिलसिला
दोन दिवसांमध्ये राज ठाकरे यांच्याकडे झालेल्या नेत्यांच्या भेटी गाजल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या भेटी घेतल्या होत्या. या सर्वांमध्ये (न)राजकीय चर्चा झाल्या होत्या. पण माध्यमांमध्ये मात्र महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरण जुळण्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
फडणवीस – अशोक चव्हाण भेट
आज त्या बातमीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटीने भर पडली आहे. आधी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता भाजपमध्ये उपाध्यक्षपदी विराजमान असलेले आणि त्यातही शिंदे – फडणवीस सरकारमध्ये “खास समन्वय” राखण्याची जबाबदारी भाजपने दिलेले नेते आशिष कुलकर्णी यांच्या मध्यस्थीने किंवा यांच्या समन्वयाने फडणवीस – चव्हाण भेट घडवून आणली आहे. आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने ही भेट झाली आहे. काही माध्यमांनी ही भेट “गुप्त” असल्याच्या बातम्या दिल्या होत्या. पण ही भेट झाल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितल्यानंतर त्यातली “गुप्तता” संपून गेली आहे… पण त्याचबरोबर या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे देखील ते म्हणाले आहेत. अर्थातच अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट ही (न)राजकीय होती हे (अ)मान्य करावे लागते!!
काँग्रेस मधली नाराजी
या भेटीमुळे अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या आणि काँग्रेसमध्ये लवकरच फूट पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेस मधला नाराज गट हा पक्षातून बाहेर पडून शिंदे गटात समाविष्ट होईल अशाही बातमी आल्या आहेत. पण फडणवीस – चव्हाण भेटीनंतर काँग्रेस मधला नाराज गट भाजपकडे वळणार अशा बातम्यांनी जोर धरला आहे. एकूण काँग्रेस मधले नाराजी हा या बातम्या मधला “कॉमन फॅक्टर” आहे फक्त तो वळणार शिंदे गटाकडे की भाजपकडे याबद्दल मतमतांतरे आहेत.
अशोक चव्हाणांची “राजकीय वर्तणूक”
आधीच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यात आता अशोक चव्हाण – फडणवीस भेटीने महाराष्ट्रापुरती तरी भर घातली आहे. ठाकरे – पवार सरकार गेल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या “राजकीय वर्तणुकीचा” आढावा घेतला तर मूळात शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी ते विधानसभेत गैरहजर राहिले. त्यांच्याबरोबर 11 आमदार गैरहजर होते. त्यानंतर काँग्रेसच्या काही बैठकांमध्ये अशोक चव्हाण हजर आणि गैरहजर असे दोन्हीही होते. हा घटनाक्रम लक्षात घेता आशिष कुलकर्णी यांच्या समन्वयातून फडणवीस – चव्हाण भेट होणे, त्या भेटीचे ठिकाण आशिष कुलकर्णी यांचे घर असणे याला विशेष महत्त्व आहे. अर्थात तिथली चर्चा मात्र अशोक चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार (न)राजकीय आहे!!
Fadnavis – Ashok Chavan meeting coordinated by Ashish Kulkarni
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव : 4 दिवसांच्या चर्चेनंतर समर्थनार्थ पडली 58 मते, भाजपचे वॉकआउट
- GST Collection : गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कर संकलनात 28% वाढ; महाराष्ट्र टॉपवर, 1.44 लाख कोटींचे कलेक्शन
- बुलेट ट्रेन आता महाराष्ट्रात सुसाट; बीकेसीतील 10000 कोटींची जमीन देणार!!
- पश्चिम रेल्वेत परीक्षेविना नोकरीची संधी!!; करा ऑनलाईन अर्ज!!