Fact Check : सोशल मिडियावर विशेषत: व्हॉट्सअपवर एक पोस्ट व्हायरल होत आहे, यात असा दावा केला जातोय की फ्रेंच नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या मते कोरोनाची लस घेतलेल्या लोकांचा दोन वर्षांत मृत्यू होईल. या दाव्याचा सरकारी संस्था पीआयबीने तपास केला असता हा व्हायरल दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे. कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचेदेखील यात सांगण्यात आले आहे. Fact Check people who get Corona vaccine die within 2 years? Know the truth of viral claim on WhatsApp
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सोशल मिडियावर विशेषत: व्हॉट्सअपवर एक पोस्ट व्हायरल होत आहे, यात असा दावा केला जातोय की फ्रेंच नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या मते कोरोनाची लस घेतलेल्या लोकांचा दोन वर्षांत मृत्यू होईल. या दाव्याचा सरकारी संस्था पीआयबीने तपास केला असता हा व्हायरल दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे. कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचेदेखील यात सांगण्यात आले आहे.
व्हायरल पोस्टमध्ये नोबेल पुरस्कार विजेते ल्यूस मॉन्टॅग्निअर यांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, लस घेणारा प्रत्येक जण दोन वर्षांत मरणार आहे. कोणत्याही प्रकारची लस घेतलेल्यांची जगण्याची शाश्वती नाही. ज्यांना लस दिली गेली आहे त्यांच्यावर उपचार होण्याची शक्यता नसल्याचेही व्हायरोलॉजिस्टने नमूद केले आहे.
व्हायरल मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, ज्यांना लस मिळाली ते सर्व दोन वर्षांत मरणार आहेत. माँटॅग्नियर यांनी याची पुष्टी केली आहे की, ही लस दिली तर जगण्याची कोणतीही शक्यता नाही. धक्कादायक मुलाखतीत जगातील अव्वल व्हायरलॉजिस्टने स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्यासाठी कोणतीही आशा नाही आणि ज्यांना यापूर्वी लस दिली गेली आहे, त्यांच्यावर कोणताही उपचार संभव नाही. आपण मृतदेह जाळायला तयार असले पाहिजे.
पीआयबी फॅक्ट चेक टीमने या व्हायरल पोस्टचा तपास करून त्यावरील फॅक्ट शेअर केल्या आहेत. पीआयबीने लिहिले की, ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, नोबेल विजेत्याच्या करण्यात आलेला दावा पूर्णपणे बोगस आहे. कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित आहेत. पीआयबीने युजर्सना ही बनावट पोस्ट फॉरवर्ड न करण्याचेही आवाहन केले आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती पीआयबी वेबसाइट pib.gov.in वर उपलब्ध आहे.
Fact Check people who get Corona vaccine die within 2 years? Know the truth of viral claim on WhatsApp
महत्त्वाच्या बातम्या
- Sputnik Lite : स्पुतनिकच्या सिंगल डोस व्हॅक्सिनची मानवी चाचणी अंतिम टप्प्यात
- कोरोनाच्या उत्पत्तीवरून अमेरिकेने चीनला फटकारले, व्हाइट हाऊसचे शास्त्रज्ञ म्हणाले- चीनचा खरा चेहरा समोर आणणे गरजेचे!
- इंडियन मेडिकल असोसिएशनचा रामदेव बाबांविरुद्ध १००० कोटींचा मानहानीचा दावा, म्हणाले- लेखी माफी मागा!
- सलमान खानचा केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला, राधेच्या निगेटिव्ह रिव्ह्यूमुळे भडकला ‘सुलतान’
- पंतप्रधान मोदींचे वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये बीजभाषण, जगभरातील बौद्ध संघ प्रमुखांशी व्हर्च्युअली संवाद