• Download App
    आमने-सामने : कोल्हापूरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप।Face-to-face: Allegations between Satej Patil and Mahadevrao Mahadik over Gokul Dudh Sangh elections in Kolhapur

    आमने-सामने : कोल्हापूरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर:  गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महाडिकांना गोकुळमधून लुटलेल्या पैशाची मस्ती आहे, असा घणाघाती हल्ला सतेज पाटील यांनी केला आहे. त्यामुळे सत्ताधारी महाडिक गटानेही पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. Face-to-face: Allegations between Satej Patil and Mahadevrao Mahadik over Gokul Dudh Sangh elections in Kolhapur



    ज दूधसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. महाडिकांना गोकुळमधून लुटलेल्या पैशाची मस्ती आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली आहे. तर, विनाकारण खालच्या पातळीवर टीका करू नका. महाडिक अजून सहीसलामत आहेत. चक्रव्युहाच्या बाहेर जायच आहे की नाही हे महाडिक ठरवणार आहे, त्यामुळे टीका करताना सांभाळून बोला, असा पलटवार महादेवराव महाडिक यांनी केला आहे. त्यावर आता पाटील काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

    येत्या 2 मे रोजी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे गोकुळवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पाटील आणि महाडिक गटात प्रचंड चुरस निर्माण झाली असून त्यातूनच या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. 2 मे पर्यंत हे आरोप-प्रत्यारोप होणार असल्याने कोल्हापूरचं राजकारण मात्र चांगलच तापणार आहे.

    Face-to-face: Allegations between Satej Patil and Mahadevrao Mahadik over Gokul Dudh Sangh elections in Kolhapur

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य