नवी दिल्ली : चीनने नुकतीच आपल्या नकाशाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या भूभागातील भारताचा भाग दर्शविला आहे. चीनच्या या डावपेचावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, बेताल दावे करून इतरांचा प्रदेश तुमचा होत नाही. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, चीनला असे नकाशे जारी करण्याची सवय आहे. तथापि, तुमच्या अधिकृत नकाशामध्ये इतर देशांचे प्रदेश समाविष्ट करण्यात काही अर्थ नाही.” External Affairs Minister S Jaishankars sharp reaction to China’s new map of Arunachal
ते म्हणाले, “चीनने आपला नकाशा ज्या भागांचा नाही त्या भागांसह जारी केला आहे. ही त्याची जुनी सवय आहे. केवळ भारताच्या काही भागांसह नकाशा जारी केल्याने काहीही बदलणार नाही. आमचे सरकार याबाबत अत्यंत सावध आहे आणि हे स्पष्ट आहे की आम्हाला आमच्या क्षेत्रात काय करायचे आहे. बेताल दावे केल्याने इतर लोकांचे क्षेत्र तुमचे होत नाही.”
अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग –
चीनने जारी केलेला प्रमाणित नकाशा भारताने नाकारला आहे. यामध्ये चीन 1962 च्या युद्धात ताब्यात घेतलेल्या अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट म्हणत आहे, तर अक्साई चीनवरही आपल्या मालकीचा दावा केला आहे. तर, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भविष्यातही तो भारताचाच एक भाग राहील असे भारताने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, पुढील आठवड्याच्या शेवटी नवी दिल्लीत होणारी G20 परिषद आणि गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत झालेल्या BRICS परिषदेनंतर चीनने हा नकाशा जारी केला आहे.
External Affairs Minister S Jaishankars sharp reaction to Chinas new map of Arunachal
महत्वाच्या बातम्या
- विरोधक आणि माध्यमे काळे चित्र दाखवायला उतावळे; परकीय गुंतवणुकीत मात्र महाराष्ट्र नंबर 1 ने उजळे!!
- आदित्य L-1 सूर्यावर कशाचा शोध घेणार?, इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नारायण यांनी दिली माहिती
- पावसात भिजल्यानंतरची रणनीती : ताई – दादांचं भांडण बारामतीत ठेवायचं झाकून; इतरांमध्ये लावून द्यायचं ठासून!!
- आदित्य L-1 चे 2 सप्टेंबरला सकाळी 11.50 ला उड्डाण; 4 महिन्यांत पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटरवर पोहोचेल