• Download App
    External Affairs Minister S Jaishankar filed application for Rajya Sabha election from Gujarat

    परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी गुजरातमधून दाखल केला राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज

    एस जयंशकर यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. जयशंकर हे यावेळी गुजरातमधून राज्यसभेचे उमेदवार आहेत. त्यांचा कार्यकाळ १८ ऑगस्ट रोजी संपत आहे. मात्र, त्यापूर्वी २४ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. सध्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. External Affairs Minister S Jaishankar filed application for Rajya Sabha election from Gujarat

    परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रविवारी गुजरातला पोहोचले. त्यांनी सोमवारी आपला अर्ज दाखल केला. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केल्यानंतर परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे आभार मानले.

    परराष्ट्रमंत्री म्हणाले, ‘सर्वप्रथम मी पंतप्रधान मोदी, भाजपा नेतृत्व आणि गुजरातमधील जनता व आमदारांचे आभार व्यक्त करू इच्छितो. चार वर्षांपूर्वी मला राज्यसभेत गुजरातचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला होता. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या चार वर्षात देशात झालेल्या बदलांचा भाग बनण्याची संधी मला मिळाली. येत्या चार वर्षात होणार्‍या प्रगतीत मी योगदान देऊ शकेन अशी आशा आहे.

    गुजरातमध्ये तीन जागांवर निवडणूक –

    गुजरातमध्ये राज्यसभेच्या एकूण तीन जागा रिक्त होणार आहेत. एस जयशंकर, जुगलजी ठाकोर आणि दिनेश अनावडिया यांचा कार्यकाळ १८ ऑगस्टला संपत आहे. अशा स्थितीत या तिन्ही जागांसाठी २४ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. गुजरातमध्ये राज्यसभेच्या एकूण ११ जागा आहेत, त्यापैकी ८ सध्या भाजपकडे आणि उर्वरित काँग्रेसकडे आहेत.

    External Affairs Minister S Jaishankar filed application for Rajya Sabha election from Gujarat

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य