• Download App
    पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांची PTI पक्षातून हकालपट्टी; इम्रान खान यांचे निकटवर्तीय होते|Expulsion of former Pakistan minister Fawad Chaudhary from PTI; He was close to Imran Khan

    पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांची PTI पक्षातून हकालपट्टी; इम्रान खान यांचे निकटवर्तीय होते

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानातील पीटीआयने माजी मंत्री फवाद चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे राईट हँड समजले जाणारे फवाद यांनी गेल्या वर्षी 9 मे रोजी झालेल्या हिंसाचारानंतर राजकारणातून ब्रेक घेतला होता. तरीही त्यांनी पक्ष सोडला नाही. आता वर्षभरानंतर पीटीआयने त्यांच्यावर कारवाई केली आहे.Expulsion of former Pakistan minister Fawad Chaudhary from PTI; He was close to Imran Khan

    पाकिस्तानी वेबसाइट एवायआर न्यूजनुसार, पीटीआयचे केंद्रीय माहिती सचिव रऊफ हसन यांनी सांगितले की, फवाद चौधरी यांच्यासह पक्षाने इम्रान इस्माईल, अली झैदी यांचीही पक्षातून हकालपट्टी केली आहे. सुप्रीमो इम्रान खान यांच्या आदेशानंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे.



    पुन्हा कधीही पीटीआयमध्ये प्रवेश करणार नाही

    रिपोर्टनुसार, पीटीआय कोअर कमिटीने एक ठराव मंजूर केला आहे. त्यानुसार हे मंत्री कधीही पक्षात परतणार नाहीत. रऊफ हसन म्हणाले, “आम्ही या व्यक्तींनी सुरू केलेल्या वक्तृत्वाला उत्तर दिले, परंतु पीटीआयचे नेते इम्रान खान यांनी आता आम्हाला कोणत्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया न देण्याचे निर्देश दिले आहेत.”

    गेल्या वर्षी अटक झाल्यानंतर या सर्व मंत्र्यांना सरकार व्हीआयपी ट्रिटमेंट देत असल्याचे रऊफ हसन यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्यापैकी कोणाचाही छळ झाला नाही. रौफ यांनीही या नेत्यांच्या सुटकेवर चिंता व्यक्त करत पीटीआयला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

    तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नरमली वृत्ती

    फवाद चौधरी यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. 5 महिन्यांनंतर त्यांची सुटका झाली. त्यांच्यावर भ्रष्टाचारासह 28 प्रकरणातील गुन्हे होते. तुरुंगातून सुटल्यानंतर फवाद चौधरी यांनी पीटीआय नेतृत्वावर टीका करण्यास सुरुवात केली. यानंतर शाहबाज सरकारच्या दबावाखाली बोलल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

    मंगळवारी जिओ न्यूजशी बोलताना ते म्हणाले की, पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वामुळेच इम्रान खान यांची तुरुंगातून सुटका होऊ शकलेली नाही. ते म्हणाले की, पीटीआयच्या सध्याच्या नेत्यांना राजकारण कसे करावे, हेच कळत नाही. त्यांच्यामुळे पक्ष बुडत आहे.

    फवाद चौधरी यांनी अलीकडेच म्हटले होते की, ते पीटीआयमध्ये जाण्यास उत्सुक आहेत. मात्र, पक्षात राहो अथवा न राहो, इम्रान खान यांच्यासोबतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. इम्रान खान यांना सोडावे लागले असते तर आतापर्यंत ते दुसऱ्या पक्षातून खासदार झाले असते, असेही फवाद चौधरी म्हणाले.

    मोदी सरकारविरोधात केली होती वक्तव्ये

    भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान फवाद चौधरी भारतीय निवडणुकांवरील वक्तव्यांमुळे चर्चेत होते. भारतात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदींचा पराभव व्हावा, अशी माझी इच्छा आहे, असे ते म्हणाले होते. फवाद म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तेव्हाच सुधारतील, जेव्हा दोन्ही देशांमधील अतिरेकी कमी होतील.

    Expulsion of former Pakistan minister Fawad Chaudhary from PTI; He was close to Imran Khan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य