विशेष प्रतिनिधी
दिल्ली : पाेलिस महा आयुक्त श्वेता चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सेंट्रल सायबर सेलने शुक्रवारी एका बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिकॉम एक्सचेंज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या बेकायदेशीर रॅकेटमागे असणाऱ्या भाषण माइंडसह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
Exposed! Delhi cyber cell busts illegal international telecom racket
डीसीपी श्वेता चव्हाण यांनी यावेळी असे सांगितले की, या बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज द्वारे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल कॉल्स दररोज आखाती देशांमधून आणि पाकिस्तानमधून येत होते. त्याचप्रमाणे हे कॉल्स कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूएई या देशांमधून देखील येत होते.
असे कॉल्स ट्रॅक करणे खूप कठीण असते. पण दिल्ली सायबर सेलने यामध्ये यश मिळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आजवर त्यांनी भारतीय सरकारला 103 कोटी रुपयांनी फसवले आहे. एका दिवसासाठी किती रुपयांना फसवले हे काढायचे झाल्यास,1.25 कोटी प्रतिदिवस इतकी रक्कम आहे.
Exposed! Delhi cyber cell busts illegal international telecom racket
महत्त्वाच्या बातम्या
- ”मुलांना पार्ले-जी खाऊ घाला, नाहीतर अनर्थ होईल’, अफवेमुळे बिस्किटांचा अचानक वाढला खप, स्टॉकिस्टही झाले हैराण
- Navratri 2021 : मूर्ती विसर्जनावेळी फक्त पाच जणांना परवानगी, बीएमसीने नवरात्रोत्सवासाठी जारी केली नियमावली
- नाशिकमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर ३.५ तीव्रता, केंद्रबिंदू जमिनीच्या ३ किमी आत
- राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर, सरकारकडून लेखी आश्वासनावर ठाम; आपत्कालीन रुग्णसेवा पुरवणार
- Farmers Protest : तुम्ही शहराचा श्वास कोंडत आहात, लोकांनी व्यवसाय बंद करावेत का?, सर्वोच्च न्यायालयाने किसान महापंचायतीला फटकारले