मोहालीतील गुप्तचर विभागाच्या इमारतीमध्ये सोमवारी रात्री उशिरा स्फोट झाला आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रॉकेटसदृश्य वस्तू पडल्याने स्फोट झाला. स्फोटामध्ये इमारतीचे मोठे नुकसान झाले. Explosion in Mohali intelligence department building, suspected rocket attack
विशेष प्रतिनिधी
मोहाली : मोहालीतील गुप्तचर विभागाच्या इमारतीमध्ये सोमवारी रात्री उशिरा स्फोट झाला आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रॉकेटसदृश्य वस्तू पडल्याने स्फोट झाला. स्फोटामध्ये इमारतीचे मोठे नुकसान झाले.
गुप्तचर विभागाच्या इमारतीमध्ये रात्री सव्वा दहा वाजता स्फोट झाला. इंटेलिजन्स विभागातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रॉकेटसदृश्य वस्तू आदळली. तिथे मोठा स्फोट झाला. या स्फोटात इमारतीचे नुकसान झाले. स्फोटाचं नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही.
मोहाली शहर अगदी पंजाबची राजधानी चंदीगडला लागून आहे. त्यामुळे मोहालीमध्ये अशी घटना घडणं याला पोलिसांनी गंभीरपणे घेतलं आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी अगदी वेगाने तपासाची सूत्रे हलवली आहे.
Explosion in Mohali intelligence department building, suspected rocket attack
महत्वाच्या बातम्या
- १० मे आणि १८५७ चं स्वातंत्र्य समर!
- Census : देशात पहिल्यांदाच ऑनलाईन जनगणना; लाभ पोहोचवण्यातही अचूकता; अमित शहांची घोषणा!!
- 124 ए : देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता सर्वोच्च, त्यात तडजोड नाही!!; राजद्रोह कायद्याबाबत कायदेमंत्री किरण रिजिजू यांची स्पष्टोक्ती!!
- NIA Dawood Ibrahim : एनआयए छाप्यांची व्याप्ती मोठी; दाऊदच्या 30 अड्ड्यांवर छापे; सलीम फ्रुट, कय्यूम कुरेशी, अजय गोसलिया ताब्यात!!