Thursday, 1 May 2025
  • Download App
    मथुरेत माकडांचा उच्छाद, बंदोबस्तासाठी महापालिकेची विशेष मोहीम, तीन दिवसांत १०० माकडे पकडली Expedition of monkeys in Mathura, special operation of NMC for security, 100 monkeys caught in three days

    मथुरेत माकडांचा उच्छाद, बंदोबस्तासाठी महापालिकेची विशेष मोहीम, तीन दिवसांत १०० माकडे पकडली

    विशेष प्रतिनिधी

    मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे माकडांनी उच्छाद मांडला आहे. मथुरावासींयांना यामुळे प्रचंड त्रास होत आहे. ही समस्या आहे माकडांची. माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने चक्क १५ दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. Expedition of monkeys in Mathura, special operation of NMC for security, 100 monkeys caught in three days



    मथुरेच्या वृंदावन परिसरातील बांके बिहार मंदिर, चौबिया पारा आणि द्वारकाधीश मंदिर परिसरात काही आठवड्यांपासून माकडांनी धुमाकूळ घातला आहे. कोणाच्या हातातून बॅग हिसकावणे, चष्मा ओढणे तसेच हातातील इतर साहित्य माकडे ओढून पळून जातात. कधी कधी तर १५-२० माकडांची टोळी एखाद्यावर हल्ला करते. गेल्या दोन वर्षांमध्ये माकडांमुळे काही जणांचा मृत्यू झाला आहे. माकडांमुळे नागरिक अक्षरश: भयभीत झाले आहेत. ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांपूर्वी नागरिकांनी मोठे आंदोलनही केले होते. माकडांचा हैदोस वाढत असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

    गेल्या तीन दिवसांमध्ये १०० माकडांना पकडण्यात आले आहे. मोहीम यशस्वी ठरल्यास इतर भागातही राबविण्यात येईल, असे आयुक्त अनुनय झा यांनी सांगितले. पकडलेल्या माकडांना चंबळच्या जंगलात सोडण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी मथुरेत माकडांनी अशाच प्रकारे धुमाकूळ घातला होता.

    Expedition of monkeys in Mathura, special operation of NMC for security, 100 monkeys caught in three days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM missing’ poster : ‘PM गायब’ पोस्टर वादावर काँग्रेसची आपल्या नेत्यांना सूचना; फक्त अधिकृत नेत्यांनीच विधाने करावी; बेशिस्तीवर कारवाई

    National Security Advisory Council: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना; माजी RAW प्रमुखांना अध्यक्ष बनवले

    गँगस्टर लॉरेन्सची पाकिस्तानला धमकी; पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार; दहशतवाद्याच्या फोटोवर क्रॉस लावला