प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशात आम आदमी पार्टीचा फुगा फुटला असला तरी दिल्ली महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांच्या झाडूला स्पष्ट कौल दिल्याचे दिसत आहे. Exit poll: Delhi Municipal Corporation election bjp, aap, congress
भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असतानाही मतदारांनी मात्र भाजपला घरचा रस्ता दाखविल्याचे एक्झिट पोल मध्ये तरी दिसत आहे. २००७ पासून दिल्ली महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र एक्झिट पोलचे आकडे पाहता भाजपची १५ वर्षांची सत्ता खालसा होऊ शकते.
दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी ४ डिसेंबरला मतदान झालं. सकाळी ८ पासून मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी ५.३० वाजता ५०.४७ टक्के मतदान झालं. २०१७ मध्ये दिल्ली महापालिका निवडणुकीत ५३.५५ टक्के मतदान झालं होतं. यावेळी २५० जागांसाठी एकूण १३४९ उमेदवार रिंगणात आहेत. महापालिका निवडणुकीचा निकाल ७ डिसेंबरला म्हणजेच परवा जाहीर होतील.
इंडिया टुडे – ॲक्सिस एक्झिट पोल
इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, आम आदमी पक्षाला १४९ ते १७१ जागा मिळू शकतात, तर भाजपची मजल ६९ ते ९१ जागांपर्यंत जाऊ शकते. काँग्रेसला केवळ ३ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अन्यांना ५ ते ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपला ३५ %, तर केजरीवालांच्या आपला ४३ % मतं मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला १० % मत मिळण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलनुसार, आपला ४६ % महिलांनी, तर ४० % पुरुषांनी मतदान केले आहे. भाजपला केवळ ३४ % महिला मतदारांनी, तर ३६ % पुरुषांनी मतदान केल्याचा अंदाज आहे.
Exit poll: Delhi Municipal Corporation election bjp, aap, congress
महत्वाच्या बातम्या
- सक्तीच्या धर्मांतर गंभीर मुद्दा; प्रतिज्ञापत्राद्वारे तोडगा सांगा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश; 12 डिसेंबरला पुढील सुनावणी
- गुजरात मध्ये मुसलमानांनी एकजूट होऊन काँग्रेसला मतदान करावे; इमाम शब्बीर सिद्दिकींचे आवाहन
- अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण हटविले; अन्य गड किल्ल्यांवरचेही अतिक्रमण काढा; शिवप्रेमींचा आग्रह
- घाटकोपरमध्ये हरित लवादाच्या आरक्षित जागेवर मदरशाचे अवैध बांधकाम