• Download App
    Exit poll Delhi आप - काँग्रेस आपापसांत भांडा; तिरंगी लढतीचा भाजपचा फायदा!!

    Exit poll Delhi : आप – काँग्रेस आपापसांत भांडा; तिरंगी लढतीचा भाजपचा फायदा!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गेल्या 11 वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीची दिल्लीची सत्ता विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर एक्झिट पोलच्या आकडेवारीतून संपुष्टात आली. विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली, तर आपची पिछेहाट झाली. हा केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का असू शकतो. Indi आघाडीत राजकीय अहंकार दाखवून आप आणि काँग्रेस भांडले. परिणामी भाजपचे फावले. एक्झिट पोल मध्ये ते दिसले.

    काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे?

    चाणक्यने वर्तवलेल्या अंदाजानुसार दिल्लीमध्ये सत्ताधारी आपला 25 ते 28, तर भाजपला 39 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 2 ते 3 जागांवर गुंडाळली
    जाण्याची शक्यता आहे.

    पोल डायरीने भाजपला 45 ते 50, तर आपला 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज दिला आहे. काँग्रेसच्या २ जागा येऊ शकतात. डीव्ही रिसर्च अनुसार भाजपला 40 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर आपला 25 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्व एक्झिट पोलचा सूर असाच आहे की, यावेळी दिल्लीमध्ये आपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

    केजरीवालांचं गणित नेमंक कुठं चुकलं?

    गेली दोन टर्म दिल्लीमध्ये आप सत्तेत आहे. केजरीवाल यांच्या नेतृत्वातील सरकारवर गेली १० वर्षे तेथील जनतेने एवढा विश्वास दाखवला की, दिल्लीमध्ये आपने अनेक रेकॉर्ड तोडले. मात्र यावेळी भाजप आणि काँग्रेसनं दिल्ली विधानसभा निवडणुकीत जोरदार रंगत आणली, भाजपने केजरीवाल यांची व्होटबँक टार्गेट केली. मुस्लिम आणि दलित बहुसंख्य असलेल्या मतदारसंघात केजरीवाल यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच १० वर्ष दिल्लीमध्ये आप सत्तेत आहे, त्यामुळे त्यांना अँटी इन्कमसीचा देखील फटका बसू शकतो. ऐन निवडणूक तोंडावर असताना अरविंद केजरीवाल यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले, त्याचा देखील फटका बसला, तर दुसरीकडे एक्झिट पोलनुसार काँग्रेसचा देखील मोठा पराभव झाला.

    Exit poll Delhi BJP wins and AAP and congress loss

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??