• Download App
    कोरोना उपचारावर झालेल्या खर्चाला आयकरातून सुट, केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय|Exemption from income tax on expenses incurred on corona treatment, decision of the Central Government

    कोरोना उपचारावर झालेल्या खर्चाला आयकरातून सुट, केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय

    कोरोना उपचार आणि मृत्यू नंतर झालेल्या खर्चाच्या रक्कमेला आयकरातून सूट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी याबाबत घोषणा केली आहे.Exemption from income tax on expenses incurred on corona treatment, decision of the Central Government


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना उपचार आणि मृत्यू नंतर झालेल्या खर्चाच्या रक्कमेला आयकरातून सूट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी याबाबत घोषणा केली आहे.

    ठाकूर म्हणाले की, केंद्र सरकारने कोविड १९ मृत्यू अथवा उपचारादरम्यान खर्च करण्यात आलेल्या रक्कमेवर सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. जर कोणत्याही कंपनीने त्यांच्या कर्मचाºयांच्या कोरोना उपचारासाठी मदत केली असेल अथवा कोणा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मदत केली असेल तर त्या रक्कमेला करात सवलत देण्यात येईल.



    याचा अर्थ ज्या व्यक्तीने त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी अथवा दुसऱ्या कोणासाठी आर्थिक मदत केली असेल तर त्याला आयकरातून सूट दिला जाईल. त्याचसोबत कोरोना उपचारासाठी ज्याला आर्थिक फायदा दिला आहे त्यालाही कोणताही कर आकारण्यात येणार नाही.

    कोरोनामुळे झालेल्या मृत्यूनंतर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अथवा एका व्यक्तीने दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांना ठराविक रक्कम दिली असेल तर त्या रक्कमेलाही करातून वगळण्यात आलं आहे. या ठराविक रक्कमेची मयार्दा १० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. २०१९-२० या आर्थिक वषार्नंतर झालेल्या या मदतींसाठी हा निर्णय झाला आहे.

    केंद्र सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या शेवटच्या तारखेला ३ महिन्याची मुदतवाढ दिली आहे. म्हणजे ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आधार कार्ड आणि पॅन लिंक करता येईल. यापूर्वी याची अंतिम मुदत ३० जून २०२१ पर्यंत होती.

    तुम्ही एसएमएसद्वारे, आयकर विभागाच्या वेबसाईट आणि जवळच्या पॅन सेवा केंद्रावर जाऊन आधार कार्ड लिंक करू शकता. त्याचसोबत सरकारने करदात्यांना आणखी एक दिलासा दिलाय तो म्हणजे टीडीएस फाइल करण्याची अखेरची तारीख १५ जुलै केली आहे. यापूर्वी ही मुदत ३० जून २०२१ होती.

    Exemption from income tax on expenses incurred on corona treatment, decision of the Central Government

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Beating Retreat 2026 : विजय चौकात बीटिंग रिट्रीट समारंभ; तिन्ही सशस्त्र दलांनी राष्ट्रपती मुर्मू यांना राष्ट्रीय मानवंदना दिली; उपराष्ट्रपती आणि PM देखील उपस्थित

    Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट