• Download App
    बिग शॉट्स वगळून मोदी - शहा यांनी भूपेंद्र पटेल यांनाच का निवडले असेल...??|Excluding Big Shots, why did Modi-Shah choose Bhupendra Patel

    बिग शॉट्स वगळून मोदी – शहा यांनी भूपेंद्र पटेल यांनाच का निवडले असेल…??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नेहमीप्रमाणे प्रसार माध्यमांना चकविले. त्यांनी चालविलेल्या कोणत्याच नावावर शिक्कामोर्तब केले नाही. शिवाय प्रसार माध्यमांनी चालविलेले राजकीय तर्कशास्त्र देखील या दोन्ही नेत्यांनी नाकारलेले दिसते.Excluding Big Shots, why did Modi-Shah choose Bhupendra Patel

    प्रसार माध्यमांनी आपकी बार पाटीदार अशी स्वयंप्रेरित घोषणा देत गुजरातमध्ये पाटीदार समाजाचा मुख्यमंत्री होईल असा कयास लावला होता. पण प्रत्यक्षात मोदी आणि शहा यांनी प्रसार माध्यमांचा हा कयासही उलथवून लावला कारण भूपेंद्र पटेल हे जरी पाटीदार समाजाचे असले तरी ते प्रस्थापित नेते नाहीत.



    प्रसार माध्यमांनी त्यांचे वर्णन आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्ती एवढेच केले आहे. शिवाय त्यांची राजकीय कारकीर्द देखील फार मोठी दिसत नाही आमदाबाद महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

    याचा सध्या लावता येणारा राजकीय अर्थ एवढाच की मोदी – शहांनी गुजरातमध्ये बिग शॉट्सना वगळून भूपेंद्र पटेलांच्या रूपाने नवा चेहरा मुख्यमंत्रीपदी बसविला आहे. भूपेंद्र पटेलांवर नुसता विश्वास दाखविलेला नाही, तर त्यांच्यावर २०२२ च्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणूकीची सर्वांत मोठी जबाबदारी देखील टाकली आहे.

    मोदी – शहा यांची ही कार्यपध्दती आहे. ते स्वतः मोठी पदे भूषविण्यापूर्वी भाजपमध्ये बिग शॉट्स मानले जात नव्हते. पण त्यांच्याकडे पक्षाने एकदा नेतृत्वाची जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांनी ती कसोशीने पाळल्याचा इतिहास सांगतो.भूपेंद्र पटेल यांच्याकडून मोदी – शहा यांची हीच अपेक्षा असू शकते. कदाचित त्यातूनच त्यांनी २०१७ मध्ये आमदार बनलेल्या भूपेंद्र पटेलांची निवड केल्याचे दिसते आहे.

    भूपेंद्र पटेल यांचे नाव भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बाहेर येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. ते विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मागे बसले होते. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांचा व्हीक्टरी साइन करतानाचा फोटो व्हायरल होतो आहे. पक्षाचे गुजरातमधील प्रवक्ते यमल व्यास यांनी ते आमदार आहेत, एवढेच सांगितले होते. यावरूनच मोदी – शहांनी हा धक्का दिल्याचे स्पष्ट होत आहे.

    Excluding Big Shots, why did Modi-Shah choose Bhupendra Patel

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार