न्यायालयीन कोठडीदरम्यान काही धार्मिक आणि आध्यात्मिक पुस्तके घेऊन जाण्याची परवानगी मागितली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांना ५ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज मनीष सिसोदिया यांच्या पुढील कोठडीची मागणी केली नाही, त्यानंतर न्यायालयाने सिसोदिया यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. Excise policy case Delhi Rouse Avenue Court sent Manish Sisodia to Judicial Custody till April 5
दरम्यान, मनीष सिसोदिया यांनी न्यायालयाला विनंती केली की, न्यायालयीन कोठडीदरम्यान काही धार्मिक आणि आध्यात्मिक पुस्तके घेऊन जाण्याची परवानगी द्यावी. यावर कोर्टाने त्यांना तुम्ही यासंदर्भात अर्ज करा, आम्ही परवानगी देऊ, असे म्हटले आहे.
अंमलबजावणी संचालनालय प्रकरणात आप नेते मनीष सिसोदिया यांच्या वतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता, ज्यावर राऊस एव्हेन्यू कोर्टाने ईडीला नोटीस बजावली होती. सिसोदिया यांच्या सीबीआय जामीन प्रकरणात वकील दयान कृष्णन यांनी युक्तिवाद केला की, मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे आणि आम्ही इतर फोन सेटबद्दल आधीच उत्तर दिले आहे. आता आमचे आवाहन आहे की, आता जामिनावर सुटकेचा आदेश द्यावा.
याशिवाय सिसोदिया यांच्या वकिलांनी आरोप केला की, सीबीआय कायद्याच्या कक्षेत काम करत नाही. सीबीआयला मिळालेल्या उपकरणांमध्ये थेट मनीष यांच्या विरोधात काहीही सापडलेले नाही. या प्रकरणात सीबीआय फक्त मनीष सिसोदियांना त्रास देत आहे. एक्साईज प्रकरणात सीबीआयच्या सर्व आरोपींना जामीन मिळाला आहे. सीबीआयकडे या प्रकरणात आता काही नवीन नाही.
Excise policy case Delhi Rouse Avenue Court sent Manish Sisodia to Judicial Custody till April 5
महत्वाच्या बातम्या
- संसदेत विरोधकांच्या गदारोळातच सरकार मार्गी लावणार कामकाज, वित्त विधेयक आणि अनुदानाच्या मागण्या मंजूर होण्याची शक्यता
- PM मोदींच्या हस्ते आज ITUच्या प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन, ‘Call Before You Dig’ अॅपदेखील लॉन्च होणार
- गुढीपाडवा : विजयी पताका श्रीरामाची झळकते अंबरी!!; विजय आणि समृद्धीचे प्रतिक
- पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज यांना RSS ची वैशिष्ट्ये सांगणार पसमांदा मुस्लिम मंच, शरीफ यांना पाठवली जाणार पुस्तके