मनीष सिसोदिया यांनी इतर लोकांच्या नावाने सिमकार्ड आणि मोबाईल खरेदी केल्याचाही ईडीचा दावा
प्रतिनिधी
Manish Sisodia News : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सीबीआयनंतर आता ईडीने कोर्टाकडे त्यांच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. कोर्टात मनीष सिसोदिया यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दयान कृष्णन यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला आहे. Excise case Manish Sisodia brought to Rouse Avenue court ED to seek 10 day custody
कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीने सांगितले की, नवीन मद्य धोरणामुळे बड्या लोकांना फायदा झाला. दक्षिण भारतातील कंपन्यांनाही या धोरणाचा फायदा पोहचवला गेला. एवढंच नाहीतर मनीष सिसोदिया यांनी इतर लोकांच्या नावाने सिमकार्ड आणि मोबाईल फोन खरेदी केल्याचा दावाही ईडीने कोर्टात केला आहे.
सुनावणीदरम्यान ईडीने न्यायालयाला सांगितले की, नवीन मद्य धोरण बनवण्यामागे षडयंत्र होते. तपास यंत्रणेने राऊस अॅव्हेन्यू कोर्टात सांगितले की, विजय नायरने इतरांबरोबर हा कट रचला होता. नवीन मद्य धोरण ठोक विक्रेत्यांना भरमसाठ नफ्यासाठी आणले गेले होते.
यादरम्यान, ईडीने विजय नायर आणि के कविता (बीआरएस एमएलसी) यांच्या भेटीबाबतही न्यायालयाला सांगितले. ईडीने सांगितले की, आरोपी बुचीबाबू गोरंटलाने खुलासा केला आहे की तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि के कविता यांच्यात राजकीय सामंजस्य होते, ज्यांनी विजय नायरचीही भेट घेतली होती. बुचीबाबू हे के कविताचे माजी स्वीय सहायक असून ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.
Excise case Manish Sisodia brought to Rouse Avenue court ED to seek 10 day custody
महत्वाच्या बातम्या
- स्वयंघोषित काँग्रेस युवराजाने सर्व मर्यादा ओलांडल्या!, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी घेतला राहुल गांधींचा समाचार
- “देशाचा अपमान मान्य नाही..”: राहुल गांधींच्या माईक बंद करण्याच्या वक्तव्यावर उपराष्ट्रपती संतापले
- ओवैसींना बी टीम म्हणून हिणवताना पवारच बनलेत का भाजपची बी टीम??
- रामचंद्र पौडेल नेपाळचे नवे राष्ट्रपती; १७ वेळा पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत झाले आहेत पराभूत