विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “इंडिया” आघाडीने रामलीला मैदानावर मोठी रॅली घेऊन मोदी सरकारला आव्हान दिले तरी प्रत्यक्षात मोदी सरकारने सुरू केलेल्या कायदेशीर कारवाया थांबण्याचे नाव घेत नाहीत. काँग्रेसला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेल्या नोटिसा मागे घेणे तर सोडाच, उलट नोटीसांपाठोपाठ नोटीसा देण्याचा सिलसिला सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसची नेमकी इन्कम टॅक्स थकबाकी तरी किती आहे??, असा सवाल तयार झाला आहे. Exactly how much is the dues of the party
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ने काँग्रेसला नवी नोटीस दिली आहे. ज्यामध्ये 2014-15 ते 2016-17 या वर्षांसाठी 1,745 कोटींच्या कराची मागणी करण्यात आली आहे.
या नव्या नोटिशीसह, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काँग्रेसकडे एकूण तब्बल 3,567 कोटींच्या कराची मागणी केली आहे. ही नवीन कराची नोटिस 2014-15 (663 कोटी रुपये), 2015-16 (सुमारे 664 कोटी रुपये) आणि 2016-17 (सुमारे 417 कोटी रुपये) याच्याशी संबंधित आहे.
तपास यंत्रणांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांकडून जप्त केलेल्या डायरीमध्ये असेल्या थर्ड पार्टी एन्ट्रीवरही काँग्रेसला कर लावण्यात आल्याचा काँग्रेस नेत्यांनी दावा केला आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने शुक्रवारी पाठवलेल्या नोटीशीत सुमारे 1823 कोटी रुपये भरण्यास सांगितले होते. पक्षाच्या खात्यातून गेल्या वर्षी १३५ कोटी रुपये काढले होते.
पण थर्ड पार्टी नोंदीवर बाकी कुठल्याही पक्षांवर कुठलाच कर लावला गेलेला नाही तो फक्त काँग्रेसवर लावला आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचे हत्यार चालवत भाजप प्रमुख विरोधी पक्षाला आर्थिकदृष्ट्या अपंग करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली असून, सर्व राजकीय पक्षांमध्ये समतोल राखला जावा यासाठी विनंती केली आहे.
याआधी गुरुवारी दिल्ली हायकोर्टाने काँग्रेसला दणका दिला होता. चार वर्षांच्या कालावधीसाठी कर अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध कर पुनर्मूल्यांकन कार्यवाही सुरू केल्याच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळल्या होत्या. त्यानंतरच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने नोटीसांपाठोपाठ नोटीसा काढल्याने काँग्रेस आर्थिक पातळीवर कायदेशीर दृष्ट्या अडचणीत आली आहे.
Exactly how much is the dues of the party
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकन ब्रिज अपघातावर अमेरिकी मासिकात भारतीयांचे वर्णद्वेषी व्यंगचित्र; जहाजाचे क्रू मेंबर्स लंगोट घातलेले दाखवले
- बारामतीत रंगणार पवार घराण्यातील संघर्ष, सुनेत्रा पवारांना महायुतीची उमेदवारी जाहीर, सुप्रिया सुळेंविरोधात मैदानात
- बारामतीत नणंद भावजयीचा लढा, फक्त नव्हे काका – पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला; तर अख्ख्या पवार कुटुंबाच्या राजकारणाभोवती आवळलेला तिढा!!
- बायडेन म्हणाले- अरब देश इस्रायलला मान्यता देण्यास तयार; अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी युद्धानंतर गाझाच्या स्थितीचा उल्लेख केला