• Download App
    श्रीलंका अंडर-19 क्रिकेटच्या माजी कर्णधाराची हत्या; घरात घुसून झाडली गोळी Ex-Sri Lanka Under-19 Cricket Captain Killed; A bullet shot into the house

    श्रीलंका अंडर-19 क्रिकेटच्या माजी कर्णधाराची हत्या; घरात घुसून झाडली गोळी

    वृत्तसंस्था

    कोलंबो : श्रीलंकेच्या अंडर-19 संघाचा कर्णधार असलेला माजी क्रिकेटपटू धम्मिका निरोशन याची मंगळवारी रात्री अंबालानगोडा येथील घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी पुष्टी केली आहे की अज्ञात हल्लेखोराने निरोशनच्या घरात प्रवेश केला आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या, तेव्हा तो त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत होता. Ex-Sri Lanka Under-19 Cricket Captain Killed; A bullet shot into the house

    ही घटना गेल्या मंगळवारी, 16 जुलै रोजी अंबालानगोडा येथील धम्मिका निरोशन यांच्या घरी घडली. अंबालनगोडा पोलिस सध्या आरोपीला पकडण्याचे प्रयत्न करत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपी 12 बोअरची बंदूक घेऊन आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

    41 वर्षीय निरोशनने 2000 मध्ये सिंगापूरविरुद्ध पदार्पण करत अंडर-19 स्तरावर श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले होते. तो दोन वर्षे अंडर-19 कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळला. निरोशन हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज होता. 2002 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये निरोशनने 5 डावात 19.28 च्या सरासरीने 7 विकेट घेतल्या होत्या.

    श्रीलंकेतील विविध स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना घडली तेव्हा माजी क्रिकेटर पत्नी आणि दोन मुलांसह घरी उपस्थित होता. श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची हत्या करणाऱ्या व्यक्तीने 12 बोअरची बंदूक वापरली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र धम्मिका निरोशन यांच्यावर गोळी का झाडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

    धम्मिका निरोशनची कारकीर्द

    धम्मिका निरोशन श्रीलंकेसाठी प्रथम श्रेणी आणि अंडर-19 क्रिकेट खेळला. निरोशनने आपल्या कारकिर्दीत 12 प्रथम श्रेणी आणि 8 लिस्ट-ए सामने खेळले. 2004 मध्ये तो शेवटचा प्रथम श्रेणी आणि लिस्ट-ए सामना खेळला होता. प्रथम श्रेणीमध्ये, धम्मिकाने 26.89 च्या सरासरीने 19 विकेट घेतल्या, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम खेळी 4/33 होती. याशिवाय, निरोशनने 19 प्रथम श्रेणी डावांमध्ये 269 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा उच्च स्कोअर 47* धावा होता. त्याने 2000 मध्ये सिंगापूरविरुद्ध पदार्पण सामना खेळला होता. धम्मिका निरोशनने अनेक वेळा संघाची कमान सांभाळली. निरोशन हा वेगवान गोलंदाज होता आणि 2002 च्या अंडर-19 विश्वचषकाच्या 5 डावात त्याने 19.28 च्या सरासरीने 7 बळी घेतले होते.

    Ex-Sri Lanka Under-19 Cricket Captain Killed; A bullet shot into the house

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे