• Download App
    कोळसा घोटाळ्यात दोषी विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; बाकीच्या आरोपींना 3 वर्षांचा तुरुंगवास!! Ex-MP Vijay Darda, son Devendra sentenced to 4 years in jail in coal block allocation case

    कोळसा घोटाळ्यात दोषी विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; बाकीच्या आरोपींना 3 वर्षांचा तुरुंगवास!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : छत्तीसगडमधील कोळसा खाणी वितरण घोटाळा प्रकरणात दोषी आढळलेले काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना दिल्लीतील विशेष न्यायालयाने चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याच वेळी याच प्रकरणात अडकलेल्या बाकीच्या तीन आरोपींना प्रत्येकी तीन वर्षांचा तुरुंगवास सुनावला आहे. Ex-MP Vijay Darda, son Devendra sentenced to 4 years in jail in coal block allocation case

    लोकमत समूहाचे चेअरमन आणि काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल या 3 आरोपींना छत्तीसगड कोळसा खाणी वाटप प्रकरणात घोटाळा केल्याबद्दल प्रत्येकी 4 वर्षांची शिक्षा तुरुंगवासाची शिक्षा दिल्लीतील विशेष न्यायालयाने सुनावली.



    त्याचबरोबर माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता आणि दोन वरिष्ठ अधिकारी के. एस. कोफ्रा आणि के. सी. सामरिया यांना या घोटाळ्यात मुख्य आरोपींना मदत केल्याबद्दल प्रत्येकी 3 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

    छत्तीसगडमध्ये कोळसा खाणीचे हक्क मिळवण्यात विजय दर्डा, देवेंद्र दर्डा, मनोज कुमार जयस्वाल यांनी अनियमित्ता केली. हे आरोप त्यांच्यावर दिल्ली न्यायालयात सिद्ध झाले. या तिघांनाही दिल्ली न्यायालयाने आधीच दोषी ठरविले होते. या सर्वांना न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. या सर्व दोषींना या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याचा हक्क अबाधित आहे.

    Ex-MP Vijay Darda, son Devendra sentenced to 4 years in jail in coal block allocation case

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार

    जागतिक व्यासपीठावर भारताच्या योगसामर्थ्याचा दिमाखदार विजय; तब्बल १०२ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई!!

    पश्चिम बंगाल पोलिसांची CID टीम ममतांच्या घरी; ममता गेल्या सोनियांच्या दारी!!