• Download App
    Sangeeta Thombare माजी आमदार संगीता ठोंबरेंच्या

    Sangeeta Thombare : माजी आमदार संगीता ठोंबरेंच्या वाहनावर दगडफेक; ठोंबरेंसह चालक जखमी; रुग्णालयात उपचारासाठी दाखल

    Sangeeta Thombare'

    विशेष प्रतिनिधी

    बीड : केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गेलेल्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे ( Sangeeta Thombare’ ) यांच्या वाहनावर एका तरुणाने दगडफेक केल्याची घटना बुधवारी (दि.28) ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. दगड लागल्याने माजी आ. ठोंबरेंसह चालक जखमी झाला आहे.



    मिळालेल्या माहितीनुसार, केजच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे या दहिफळ (वडमाऊली) येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास 28 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास गेल्या होत्या. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून त्या ऋषी गदळे यांच्या घरी चहापाण्यासाठी जात असताना विजय उत्तमराव गदळे याने त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.

    चालकाच्या बाजूचा काच फुटला

    यात चालकाच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे याला लागला. तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांना लागून त्याही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा सुरू होती.

    Ex-MLA Sangeeta Thombare’s vehicle pelted with stones

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Oxford Union : ऑक्सफर्डमध्ये भारतीय-पाकिस्तानी विद्यार्थ्यांमध्ये डिबेट; भारतीय विद्यार्थी म्हणाला- निर्लज्ज देशाला लाजवू शकत नाही, मुंबई हल्ल्यातून कटू धडा मिळाला

    Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाने म्हटले-हवा आणीबाणीसारखी, एअर प्युरिफायरवर 18% GST का? हा स्वच्छ नसेल तर कर कमी करा

    Rajasthan : राजस्थानात सीमेजवळ नवीन एअरबेस तयार होणार; पाकिस्तानच्या 3 मोठ्या सुरक्षा ठिकाणांवर काही सेकंदात पोहोचतील फायटर जेट