• Download App
    ईडब्ल्यूएस आरक्षणाची 13 सप्टेंबरपासून सुनावणी : 3 मुद्दे निश्चित, 103व्या घटनादुरुस्तीची वैधताही तपासणार|EWS reservation hearing from September 13 3 issues fixed, validity of 103rd amendment will also be examined

    ईडब्ल्यूएस आरक्षणाची 13 सप्टेंबरपासून सुनावणी : 3 मुद्दे निश्चित, 103व्या घटनादुरुस्तीची वैधताही तपासणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आर्थिक मागासवर्गीयांना (ईडब्ल्यूएस) राखीव जागा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध दाखल झालेल्या याचिकांवर १३ सप्टेंबरपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.EWS reservation hearing from September 13 3 issues fixed, validity of 103rd amendment will also be examined

    गुरुवारी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने सुनावणीवेळी तीन मुद्दे निश्चित केले आहेत. अॅटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या तीन मुद्द्यांवर सुनावणी करण्यास न्यायालयाने संमती दिली आहे. या तीन मुद्द्यांवर चर्चा करून योग्य निष्कर्ष काढता येईल, असे घटनापीठाने सांगितले.



    या ३ मुद्द्यांवर सुनावणी

    1. १०३ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सरकारला आर्थिक आधारावर आरक्षण बहाल करण्याचा अधिकार प्राप्त झाला. ही दुरुस्ती घटनेच्या मूळ चौकटीच्या विरोधात आहे का ?

    2. या दुरुस्तीमुळे विनाअनुदानित शिक्षण संस्थांतील प्रवेशाचे नियम बनवण्याची मुभा मिळाली. त्यामुळेही ही दुरुस्ती घटनेच्या मूळ चौकटीचे उल्लंघन करणारी आहे का ?

    3. गरिबांच्या आरक्षणात ओबीसी, एससी, एसटी यांचा समावेश नाही. त्याआधारे ही घटनादुरुस्ती मूळ चौकटीचे उल्लंघन करणारी आहे का ?

    EWS reservation hearing from September 13 3 issues fixed, validity of 103rd amendment will also be examined

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी