• Download App
    कोरेगाव भीमा दंगलीची साक्ष; पवारांचे नवे "हिट अँड रन"!!Evidence of Koregaon Bhima riots; Pawar's new "hit and run"

    Sharad Pawar : कोरेगाव भीमा दंगलीची साक्ष; पवारांचे नवे “हिट अँड रन”!!

    सन 2018 च्या कोरेगाव-भीमा दंगलीत चौकशी आयोगासमोर शरद पवारांनी तिसऱ्या समन्सनंतर आज साक्ष नोंदवली. आधीच्या दोन समन्सच्या वेळी ते वेगवेगळी कारणे असल्याने न्यायमूर्ती जयनारायण पटेल आयोगासमोर हजर राहिले नव्हते. त्यांनी काहीच दिवसांपूर्वी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करून या दंगलीसंदर्भात आपल्याला काही माहिती नाही. कोणी आपल्याला काही सांगितले नाही, असे आधीच स्पष्ट करून ठेवले होते. ही एक प्रकारे “हिट अँड रन”ची तयारी होती…!! Evidence of Koregaon Bhima riots; Pawar’s new “hit and run”

    – संभाजी भिडेंवरचे आरोप ठरले खोटे 

    पवारांनी याआधी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे या हिंदुत्ववादी नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. इतकेच काय तर एल्गार परिषद – भीमा कोरेगावची दंगल यांच्यातील कनेक्शन बाहेर आल्यानंतर तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने ताब्यात घेतला. शहरी नक्षलवाद्यांना अटक केली. त्यावर देखील पवार यांनी जोरदार शरसंधान साधले होते. पण दरम्यानच्या काळात दंगल तपासाचे काम राष्ट्रीय तपास संस्थेने पूर्ण करीत आणले आणि पण जसजसे चौकशी आयोगाची कामकाज पुढे गेले तस तसे पवारांनी आपल्या आधीच्या आरोपातून अंग काढून घ्यायला सुरुवात केली.



    – प्रकाश आंबेडकरांविषयीचा प्रश्न टाळला

    मधल्या दीड-दोन वर्षांच्या काळात तर पवार भीमा कोरेगाव विषयी काही बोललेच नाहीत. आणि एकदम काही दिवसांपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करून दंगलीची आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगून मोकळे झाले. आज साक्ष नोंद होण्यापूर्वी कालची पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत, असे न्यायालयात सांगून पवारांचे आरोप खोटे ठरवले. म्हणजे पुन्हा एकदा “हिट अँड रन”ची पुढचे पाऊल पडले गेले.

    … आणि आज पवारांनी अतिशय चलाखीने न्यायमूर्ती पटेल यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. पण प्रकाश आंबेडकरांविषयीच्या नेमक्या प्रश्नाला नेमके उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. प्रकाश आंबेडकरांचा विषयी आंदोलन आंदोलनाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने थेट थेट भाष्य करणार नाही. मी फक्त कोरेगाव भीमाच्या दंगलीसंदर्भात साक्ष नोंदवायला आलो आहे, असे पवार म्हणाले.

    – चौकशीतून अंग बाहेर

    याचा अर्थच संपूर्ण दंगल प्रकरणातूनच आपले अंग काढून घेण्याचे कौशल्य पवारांनी दाखविले आहे. इतकेच काय तर भविष्यातही आपल्यापर्यंत कुठल्या गोष्टी येऊ नयेत याची “व्यवस्था” त्यांनी आपल्या एका उत्तरातून करून ठेवली आहे. आयोगापुढे साक्षीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा अन्य नेत्यांना बोलावेसे वाटते का??, या प्रश्नावर उत्तर देताना तो आयोगाचा अधिकार आहे. ते आयोगाने ठरवायचे आहे, असे उत्तर देऊन त्यातूनही आपले अंग काढून घेतले. हेच ते पवारांचे “हिट अँड रन” आहे.

    – नॅरेटिव्हनुसार आरोप, प्रसंगी बॅकआऊट!!

    कुठली घटना घडली आपल्या राजकीय नॅरेटिव्ह नुसार आरोपांच्या फैरी झाडायच्या. त्यात आपले विशिष्ट हेतू साध्य करून घ्यायचे. दरम्यानच्या काळात या घटनेची चौकशी अथवा तपास पुढे गेला, की “बॅकआऊट” व्हायचे हा पवारांचा नेहमीचा खाक्या राहिला आहे. आपले जुने राजकीय हिशेब देतच बसायचे नाहीत, तर नवीन मुद्दे काढून पुढे – पुढे जात राहायचे, हा देखील पवारांचा खाक्‍या राहिला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातून अंग काढून घेऊन पवारांनी हेच साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

    – 124 ए राज्यसभा

    124 ए राजद्रोहाचे कलम काढून टाकण्याविषयी राज्यसभेत बोलू, असे ते न्यायमूर्ती पटेल यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले आहेत. 124 ए संदर्भात प्रतिज्ञापत्रात मत मांडले पण आपण संसद सदस्य असताना राज्यसभेत का बोलत नाही असा सवाल न्यायमूर्ती पाटील यांनी पवारांना विचारला होता त्यानंतर त्यांनी होय, राज्यसभेत बोलू!!, असे उत्तर दिले आहे. यामुळे आता ते राज्यसभेत यासंदर्भात केव्हा बोलतात??, कोणता प्रस्ताव मांडतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Evidence of Koregaon Bhima riots; Pawar’s new “hit and run”

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य