• Download App
    लॉकडाउनसाठी केंद्रावर दबाव, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तज्ज्ञ आग्रही|Everyone insisting lockdown to central govt.

    लॉकडाउनसाठी केंद्रावर दबाव, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तज्ज्ञ आग्रही

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली  : देशभर पुन्हा एकदा लॉकडाउन लागू करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार, त्यापाठोपाठ सर्वोच्च न्यायालय आणि आता तर राजकीय वर्तुळातून देखील पूर्ण लॉकडाउनची मागणी होऊ लागली आहे.Everyone insisting lockdown to central govt.

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज संसर्ग रोखायचा असेल तर पूर्ण लॉकडाउन हाच एकमेव पर्याय शिल्लक राहिला असल्याचे म्हटले आहे.



    तत्पूर्वी अमेरिकेतील साथरोग नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. अँटनी फॉसी यांनीही भारतामध्ये काही आठवडे तरी पूर्ण लॉकडाउन करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. केंद्र सरकारची कोरोनाविषयक टास्क फोर्स देखील देशव्यापी लॉकडाउनसाठी आग्रही असल्याचे समजते.

    सध्या दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाना, पंजाबपाठोपाठ बिहार, ओडिशा या राज्यांमध्ये देखील कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात देखील निर्बंधांना आणखी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून उर्वरित राज्ये देखील तोच कित्ता गिरविण्याची शक्यता आहे.

    Everyone insisting lockdown to central govt.

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!