वृत्तसंस्था
नवी दिल्ली : महागाई आवाक्यात राहण्याच्या व देशांतर्गत मागणी बळकट राहण्याच्या अंदाजाने भारत २०२३-२४ मध्येही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून कायम राहील. हा मुद्दा केंद्र सरकारच्या सप्टेंबर महिन्याच्या आर्थिक आढावा अहवालात मांडला आहे. तथापि, या आढाव्यात इस्रायल-हमास संघर्षावर चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, यामुळे अडचणी वाढू शकतात. कच्च्या तेलाचे दर वाढू शकतात. इंधनाचे दर वाढल्याने महागाईत वाढ होणेही शक्य आहे.Even in 2023-24, India’s growth rate will be the highest in the world; The central government released the financial review for September
अमेरिका महागागाई नियंत्रित करण्यासाठी व्याजदर वाढवण्यासह इतर आर्थिक निर्बंध लावण्यास बाध्य होऊ शकतो. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, युद्धाच्या धोक्यामुळे जागतिक धोके वाढतील. भारतासह जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मात्र, देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. खासगी वापरात वाढ आणि गुंतवणुकीची मागणी वाढल्यामुळे स्थिती चांगली राहील. देशातील प्रॉपर्टी मार्केट वाढेल. मागणी पूर्ण करण्यासाठी उद्योग त्यांची उत्पादन क्षमता वाढवतील.
महागाईच्या भीतीने सेन्सेक्स ८२६ अंकांनी घसरला
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात चौफेर विक्रीचे वातावरण होते. त्यामुळे सेन्सेक्स ८२६ अंकांनी घसरून ६४,५७२ वर तर निफ्टी २६१ अंकांनी घसरून १९,२८२ वर आला. सलग चौथ्या दिवशी देशांतर्गत बाजारात घसरण झाली. तज्ज्ञांच्या मते, इस्रायल-हमास युद्ध, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, महागाई वाढण्याची भीती, डॉलरची मजबूती आणि दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमजोर असल्यामुळे भारतीय शेअर बाजार घसरला.
Even in 2023-24, India’s growth rate will be the highest in the world; The central government released the financial review for September
महत्वाच्या बातम्या
- मराठा – ओबीसी आरक्षणावरून सरकारची कोंडी करायचा काँग्रेसचा दुहेरी डाव!!
- हाफीज सईदचा म्होरक्या दहशतवादी, लष्कर ए तैय्यबाचा कमांडर हाशिम अली अक्रमला गाजा पट्टीत ठोकले!!
- राष्ट्रवादी आणि भाजपात ट्वीटर वॉर; शरद पवारांनी बावनकुळेंबाबत केलेलं विधान कारणीभूत!
- धर्मवीर आनंद दिघेंच्या रुपात टेंभीनाक्यावर पोहोचला प्रसाद ओक! व्हिडीओ झाला व्हायरल !