• Download App
    तेलात तळले, साखरेत घोळले तरी कडूच कारले, काँग्रेसवाले नाही सुधारले!!; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चंद्रपुरातून घणाघातEven if fried in oil, mixed with sugar, it turned bitter, Congressmen did not improve!!; Prime Minister Narendra Modi was shot dead from Chandrapur

    तेलात तळले, साखरेत घोळले तरी कडूच कारले, काँग्रेसवाले नाही सुधारले!!; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चंद्रपुरातून घणाघात

    विशेष प्रतिनिधी

    चंद्रपूर : तेलात तळले, साखरेत घोळले तरी कडूच कारले; काँग्रेसवाले नाही सुधारले!!, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज चंद्रपुरातून घणाघात करत महाराष्ट्राच्या प्रचार मोहिमेची सुरुवात केली.Even if fried in oil, mixed with sugar, it turned bitter, Congressmen did not improve!!; Prime Minister Narendra Modi was shot dead from Chandrapur

    आपला दक्षिण भारतातला पहिला टप्प्यातला दौरा अटकून पंतप्रधान मोदी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात गेले आणि तिथून त्यांनी बस्तर मार्गे आज महाराष्ट्र गाठला. आज (८ एप्रिल) त्यांनी भाजपाचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते यांच्यासाठी चंद्रपुरात जंगी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेससह शिवसेनेच्या ठाकरे गटावर सडकून टीका केली. मोदी म्हणाले, या वेळी चंद्रपूरने ठरवलं आहे ‘फिर एक बार ४०० पार’… याच चंद्रपूरने राम मंदिराच्या निर्मितीसाठी आणि संसदेच्या नवीन इमारतीसाठी लाकडं पाठवली आहेत हे आम्ही विसरलो नाही



    नरेंद्र मोदी म्हणाले, देशात एका बाजूला भाजपाप्रणित एनडीएचं सरकार आहे, ज्यांना केवळ देशासाठी कठोर आणि भक्कम निर्णय घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि “इंडी” आघाडी आहे ज्यांचा एकच मंत्र आहे, जिथे सत्ता मिळेल तिथली मलाई खाऊन टाकणे… इंडी आघाडीने देशाला नेहमीच अस्थिर ठेवलं आहे. एक स्थिर सरकार का आणि किती गरजेचं असतं ते या महाराष्ट्राशिवाय दुसऱ्या कोणाला कळणार? इंडी आघाडीचं केंद्रात सरकार होतं तोवर महाराष्ट्राची उपेक्षा होत राहिली. इंडी आघाडी कट रचून, जनादेश बाजूला ठेवून सत्तेत आली तेव्हा स्वतःचा विकास हाच त्यांचा मंत्र होता.

    मराठीत एक म्हण आहे, कडू कारले, तुपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच राहतं. तुम्ही त्याला काहीही करा त्याचा कडवटपणा जाणार नाही. ही म्हण काँग्रेसला तंतोतंत लागू होते. कारण काँग्रेसवाले कधीच सुधारणार नाहीत. त्यांनी आतापर्यंत जी कूकर्मं केली आहेत, त्यामुळे त्यांनी देशातला जनाधार गमावला आहे. त्यामुळे काँग्रेसने आता फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबलं आहे. तुम्ही त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा पाहा, त्यात मुस्लीम लीगची भाषा दिसतेय. ते तुम्हाला मान्य आहे का? देश हे सगळं स्वीकारेल का??

    पंतप्रधान म्हणाले, इंडी आघाडीचे खासदार भारताचा आणखी एक तुकडा पाडण्याच्या बाता मारत आहेत. दक्षिण भारताला आपल्या देशापासून तोडून वेगळा देश बनवण्याच्या गोष्टी करत आहेत. स्टलिन यांचा द्रमुक पक्ष सनातन धर्मावर टीका करतो. सनातन धर्माची डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराशी तुलना केली जाते, दुसऱ्या बाजूला काँग्रेसवाले बनावट शिवसेनेबरोबर मोर्चे काढताहेत.

    काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडितांची हत्या होत होती तेव्हा महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरी पंडितांसाठी आवाज बुलंद केला होता, याची आठवण पंतप्रधान मोदींनी काढले

    Even if fried in oil, mixed with sugar, it turned bitter, Congressmen did not improve!!; Prime Minister Narendra Modi was shot dead from Chandrapur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य