• Download App
    कर्नाटकात मतदान सुरूअसतानाच काँग्रेस नेत्यांचे आकड्यांचे उंच उंच दावे; भाजप नेत्यांचे मात्र सावध पवित्रे!!Even as the polls are underway in Karnataka, Congress leaders are making tall claims about the numbers

    कर्नाटकात मतदान सुरूअसतानाच काँग्रेस नेत्यांचे आकड्यांचे उंच उंच दावे; भाजप नेत्यांचे मात्र सावध पवित्रे!!

    वृत्तसंस्था

    बेंगलुरु : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना काँग्रेस आणि भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दर्शवणारी व्यक्तव्य समोर आले आहेत. काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी उत्साहात काँग्रेसच्या विजयाचे आकडेच सांगितले आहेत, तर भाजपचे नेते बसवराज बोम्मई, प्रल्हाद जोशी, शोभा करंदलजे आदी नेत्यांनी सावध भूमिका घेत कर्नाटकात बहुमताचे डबल इंजिन सरकार बनेल, अशी वक्तव्य केले आहेत. Even as the polls are underway in Karnataka, Congress leaders are making tall claims about the numbers

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असून पहिल्या काही तासांमध्येच भाजप काँग्रेस आणि जेडीएसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये मतदान केले. काँग्रेस नेत्यांनी आवर्जून मंदिरांमध्ये जाऊन पूजा अर्चा करून मतदानाला गेले. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मैसूरच्या वरुणामध्ये सिद्धरामेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली आणि त्यानंतर मतदान केले.

    कर्नाटकात काँग्रेसच्या बाजूने प्रचंड अनुकूल वातावरण आहे जनतेला 40% भ्रष्टाचाराचे सरकार घालवायचे आहे. त्यामुळे काँग्रेसला 145 ते 150 जागांवर विजय मिळेल, असा दावा सिद्धरामय्या यांनी केला आहे. पण डी. के. शिवकुमार यांनी हाच आकडा 5 ने कमी करून 140 पर्यंत खाली आणला आहे.

    भाजपच्या नेत्यांनी मात्र सावध पवित्रा घेत बहुमताचे सरकार बनवू एवढेच सांगितले आहे. त्यांनी बहुमताचा कोणताही आकडा सांगितलेला नाही. बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसवर शरसंधान साधताना ते फक्त भ्रष्टाचारावर बोलतात, पण प्रत्यक्षात त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब आहे. त्यामुळे कर्नाटकच्या जनतेला चांगले सरकार कोण देऊ शकतो??, याची जनतेला पक्की जाणीव आहे. त्यामुळे जनता भाजपच्या बाजूने कौल देईल, असे बोम्मई यांनी सांगितले.

    त्याच वेळी भाजपचे नेते केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शोभा करंदलजे, खासदार तेजस्वी सूर्य आदींनी कर्नाटकात भाजनच बहुमताचे सरकार बनवून डबल इंजिन सरकार गतिमान विकास करेल, अशी वक्तव्य केले आहेत. यापैकी भाजपच्या कोणत्याही नेत्याने बहुमताचा निश्चित आकडा कोणता??, या संदर्भात दावा केलेला नाही.

    Even as the polls are underway in Karnataka, Congress leaders are making tall claims about the numbers

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य