वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकमेकांचे मित्र पक्ष उरले नसून ते एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत त्यामुळे ते एकमेकांच्या नेत्यांची खेचायची संधी सोडत नाहीत. अशीच संधी घेत काँग्रेसच्या बड्या नेत्याने केजरीवालांची आज खेचली.
दिल्ली विधानसभा निवडणुका आम आदमी पार्टीने जिंकल्या, तरी अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत, असा दावा त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणाऱ्या संदीप दीक्षित यांनी केला. संदीप दीक्षित काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून ते दोनदा दिल्लीतून खासदार होते. ते दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव आहेत. काँग्रेसने केजरीवाल यांच्या विरोधात त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या मताला विशेष महत्त्व आहे.
दिल्लीच्या दारू घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना काही अटी शर्ती घातल्या त्यानुसार ते कुठल्याही सरकारी फायलीवर सही करू शकत नाही या अटी शर्ती आजही कायम आहेत त्यामुळेच त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले आणि आतिशी मार्लेना यांना त्या खुर्चीवर बसवावे लागले. फेब्रुवारी 2025 मध्ये आम आदमी पार्टी जरी दिल्लीची विधानसभा निवडणूक जिंकली, तरी केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनता येणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात बदल झालेला नाही, असे संदीप दीक्षित म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात खटला दाखल करण्यासाठी राज्यपालांची परवानगी लागत होती. ती परवानगी दिल्लीच्या राज्यपालांनी नुकतीच दिल्याने लवकरच नव्या खटल्यात अडकणार आहेत. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची आणि केजरीवाल यांच्यातले अंतर वाढत चालले आहे.
Even after winning the Delhi elections, Kejriwal is far from the chair.
महत्वाच्या बातम्या
- पॉपकॉर्नपासून जुन्या गाड्यांपर्यंत ‘या’ वस्तू महागल्या!
- परदेशात जाणारे भारतीय म्हणजे आपल्या संस्कृतीचे राजदूत -सुनील आंबेकर
- खातेवाटपात गृहखात्यासकट फडणवीस आणि भाजपचे वर्चस्व; शिंदेंकडे खाती गृहनिर्माण आणि नगरविकास तर अजितदादांकडे अर्थ!!
- Sarangi : भाजप खासदार सारंगी अन् राजपूत यांच्या प्रकृतीबाबत आले अपडेट!