वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना आता कोणत्याही बँकेतून पेन्शन काढण्याची सुविधा मिळणार आहे. ‘ईपीएफओ’ने देशभरातील सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टिम (सीपीपीएस) सुरू केली आहे. यामुळे पेन्शन सुरू झाल्यावर पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही आणि रक्कम लगेच खात्यात जमा होईल. देशभरातील ६८ लाखांहून अधिक पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी प्रत्येक प्रादेशिक कार्यालयाचे केवळ ३ ते ४ बँकांशी स्वतंत्र करार होते.
सीपीपीएस अंतर्गत पेन्शनधारकाने स्थान, बँकेची शाखा बदलली तरीही पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित करावी लागणार नाही. यामुळे निवृत्तीनंतर आपल्या गावी जाणाऱ्या पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, या उपक्रमामुळे पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून, कोणत्याही शाखेतून पेन्शनची रक्कम दरमहा सहज मिळू शकेल.
EPFO pension can be withdrawn from any bank, 68 lakh pensioners across the country will get the benefit
महत्वाच्या बातम्या
- Amit Shah : काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता. आजही राहणार आहे, असं शाह यांनी ठामपणे सांगितले.
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- America : अमेरिकेत आणखी एक मोठा हल्ला; न्यूयॉर्कच्या नाईट क्लबमध्ये गोळीबार, 11 जखमी
- Nitish Kumar : लालूंनी नितीश कुमारांना इंडि आघाडीत परतण्याची दिली ऑफर