• Download App
    Tejashwi Yadav लालू, राबडी अन् तेजस्वी यादव यांच्यावर

    Tejashwi Yadav : लालू, राबडी अन् तेजस्वी यादव यांच्यावर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे!

    Tejashwi Yadav

    सीबीआयने न्यायालयासमोर केला युक्तिवाद


    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : Tejashwi Yadav  लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढणार आहेत. लालूंसोबत त्यांचे कुटुंबही सीबीआयच्या कचाट्यात आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मधील अनियमिततेशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी, मुलगा आणि इतरांवर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे सीबीआयने शुक्रवारी दिल्लीच्या एका न्यायालयात सांगितले.Tejashwi Yadav

    लालू प्रसाद यादव त्यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि इतरांविरुद्धच्या खटल्यातील आरोपांवर विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांच्यासमोर सीबीआयने हा युक्तिवाद केला.



    या प्रकरणात गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आणि भ्रष्टाचार असे आरोप आहेत, ज्यात जास्तीत जास्त सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. न्यायालयाने म्हटले की, ‘आरोपाच्या पैलूवर सीबीआयचे आंशिक युक्तिवाद ऐकून घेण्यात आले आहेत.’ सीबीआयच्या वतीने पुढील युक्तिवाद सादर करण्यासाठी १ मार्च २०२४ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

    या प्रकरणातील कागदपत्रांची यादी सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने सीबीआयला दिले. तीन आरोपींची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. आरोपी सध्या जामिनावर आहेत. एका खासगी कंपनीला दोन आयआरसीटीसी हॉटेल्स चालवण्याचे कंत्राट देण्यात कथित अनियमिततेमुळे हे प्रकरण उद्भवले आहे.

    Enough evidence to prosecute Lalu Rabri and Tejashwi Yadav

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले