वृत्तसंस्था
नवी दिल्ली – दिल्लीतील फ्री लान्स पत्रकार राजीव शर्मा याला चीनला भारताविषयी गुप्त माहिती पुरविल्याबद्दल सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. राजीव शर्मा चीनच्या गुप्तहेर अधिकाऱ्यांना भारताविषयीची गुप्त आणि संवेदनशील अशी माहिती पुरवत होता. त्याबदल्यात राजीव शर्मा आणि इतर काही अज्ञात व्यक्तींना पैसा दिला जात होता. हा पैसा हवालामार्फत पुरवला जात होता. Enforcement Directorate (ED) has arrested Rajeev Sharma, a freelance journalist under PMLA on the charges
यासाठी दिल्लीतील महिपालमध्ये असलेल्या बनावट कंपन्यांच्या नावांचा आधार घेण्यात आला. या कंपन्या चीनी नागरिकत्व असलेल्या नावावर होत्या. झँग चँग उर्फ सूरज, झँग लिक्सिया उर्फ उषा आणि किंग शी अशा तीन चिनी नागरिकत्व असणाऱ्या व्यक्तींसोबतच शेर सिंग उर्फ राज बोहरा या नेपाळी व्यक्तीच्या नावे देखील या बनावट कंपन्यांची नोंद करण्यात आली होती. या चीनी कंपन्या पैसा हस्तांतरीत करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत होत्या. राजीव शर्माला बेनामी बँक खात्यांमधून देखील पैसे मिळाल्याचे ईडीने नमूद केले आहे.
राजीव शर्माला १ जुलैला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी आठवडाभरासाठी ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात देखील ईडीकडून राजीव शर्माला अटक करण्यात आली होती. भारतीय लष्कराविषयी महत्त्वाची माहिती चीनी हेरांना दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, अटकेनंतर ६० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल न केल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२०मध्ये त्याला जामीन दिला होता.
Enforcement Directorate (ED) has arrested Rajeev Sharma, a freelance journalist under PMLA on the charges
महत्त्वाच्या बातम्या
- मध्यप्रदेशात संध्याकाळी बनलेला रस्ता दुसऱ्या दिवशी गेला चोरीस, ग्रामस्थांच्या तक्रारीमुळे प्रशासन हादरले
- राफेल डीलच्या चौकशीत फ्रान्सचे मोठे पाऊल, जजची झाली नियुक्ती, अनेक व्हीआयपींच्या अडचणीत वाढ
- Oil india Recruitment : ऑईल इंडियामध्ये 12वी पास तरुणांची 120 जागांवर भरती; असा करा अर्ज
- कल्पना चावला, सुनीता विल्यम्सनंतर अंतराळात जाणार भारतकन्या सिरीशा, 11 जुलैला व्हर्जिन गॅलेक्टिकचे उड्डाण
- Covaxin च्या थर्ड फेज ट्रायलचे रिझल्ट जाहीर, कोरोनाच्या गंभीर प्रकरणातही 93% प्रभावी ठरली भारतीय लस