• Download App
    रोजगाराबद्दल खोटे नॅरेटिव्ह पसवणारे देशाच्या विकासयात्रेचे शत्रू; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल!! Enemies of the country's development journey spreading false narratives about employment

    रोजगाराबद्दल खोटे नॅरेटिव्ह पसवणारे देशाच्या विकासयात्रेचे शत्रू; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : रोजगाराबद्दल खोटे बोलणारे, खोटे नॅरेटिव्ह पसरवण्यात आघाडीवर असलेले लोक देशाच्या विकासयात्रेचे शत्रू आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. Enemies of the country’s development journey spreading false narratives about employment

    पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी आज प्रथमच मुंबई दौऱ्यावर आले. त्यांच्या हस्ते मुंबईतल्या 29000 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन झाले. मुंबई दौऱ्यात त्यांना महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘रोजगारावरून खोटे नरेटिव्ह सेट करणाऱ्यांची बोलती बंद केली. खोटे नरेटिव्ह सेट करणारे देशाच्या विकासयात्रेचे, देशात होत असलेल्या गुंतवणुकीचे दुश्मन आहेत.

    इन्फ्रास्ट्रकरच्या निर्मितीचे दुश्मन आहेत, भारताच्या विकासाचे दुश्मन आहे. त्यांचे धोरण तरुणांचा विश्वासघात आणि रोजगार रोखणारी आहे. त्यांची पोलखोल होत आहे. त्यांचं खोटेपण उघड होत आहे. पूल तयार होत असेल, रेल्वे ट्रॅक होत असेल रोड होत असेल तर कुणाला तरी रोजगार मिळतोच. देशात इन्फ्रास्ट्रक्चरची गती वाढत आहे, तसेच रोजगाराची गतीही वाढत आहे. येत्या काळात अधिक संधी निर्माण होणार आहे.’

    ‘वंचितांना प्राधान्य देण्याचं एनडीएच्या विकासाचं मॉडेल आहे. दशकांपासून वंचित लोक दूर होते. त्यांना आम्ही प्राधान्य देत आहोत. आमच्या नव्या सरकारने पक्की घरं आणि शेतकऱ्यांशी संबंधित मोठे निर्णय घेतले आहे. आतापर्यंत चार कोटी लोकांना घरे मिळाले आहेत. येत्या काळात तीन कोटी लोकांना पक्की घरे आहेत. यात महाराष्ट्रातील गरीब, दलित ओबीसी आणि आदिवासी लोक सामील आहेत. चांगलं घर प्रत्येक कुटुंबाची गरज नाही, त्याच्या प्रतिष्ठेचं लक्षण आहे.’

    ‘माझं ध्येय मुंबईला जगाची थिंक टॅक कॅपिटल बनवायची आहे. महाराष्ट्र टुरिझममध्ये भारतातील नंबर वन राज्य बनावं. या ठिकाणी शिवाजी महाराजांचे शौर्याचे साक्षी किल्ले आहेत. इथे सह्याद्रीच्या रांगा आहेत. कोकणातील अथांग समुद्र आहे. कॉन्फरन्स टुरिझम आणि मेडिकल टुरिझमची शक्यता आहे. भारतात विकासाची नवी गाथा लिहिण्याचं काम महाराष्ट्र करत आहे. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. हा कार्यक्रम हेच ध्येय गाठण्यासाठी आहे.

    Enemies of the country’s development journey spreading false narratives about employment

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India and US : अमेरिकेला पशुखाद्य विकण्यास परवानगी देऊ शकतो भारत; 9 जुलैपूर्वी व्यापार करार करण्याचा प्रयत्न

    PM Modi in Trinidad : मोदी त्रिनिदाद-टोबॅगोच्या दौऱ्यावर; 180 वर्षांपूर्वी येथे गिरमिटिया गेले होते, आता राष्ट्रपती-PMसह 40% भारतीय वंशाची लोकसंख्या

    Delhi HC Bans Patanjali : पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीवर दिल्ली HC कडून बंदी; डाबरने म्हटले- आमचे च्यवनप्राश हे आयुर्वेदिक औषध