विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रयागराज मधील दहशतीचा दारूण अंत झाला आहे. अतीक अहमद आणि अशरफ अहमद या दोन गँगस्टर माफियांचा तिघांनी पॉईंट ब्लँक रेंज मधून पोलिसांच्या हजे रीत निर्घृण हत्या केली आहे. तीन आरोपी मीडियाकर्मी बनून आले आणि पोलिसांच्या ताफ्यात त्यांच्या समोर तिघांनी सिनेमा स्टाईल धडाधड गोळीबार करत अतीक अहमद आणि अशरफ अहमद या दोन गँगस्टर माफियांची भर रस्त्यात हत्या केली. End of terror in Prayagraj; Atiq Ahmed, Ashraf Ahmed brutally killed by three
यामुळे प्रयागराज मधील प्रचंड दहशतीचा अंत झाला असला तरी अतीक आणि अशरफ यांच्या निर्घृण हत्येमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेचा सर्वात मोठा प्रश्न समोर आला आहे.
त्याचबरोबर भारतातील दहशतवादी कारवायासंदर्भातला अत्यंत महत्त्वाचा दुवा अतीक अहमद याच्या रूपाने नाहीसा झाला आहे. अतीक अहमद आणि अशरफ अहमद पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि लष्कर ए तैय्यबा या दोन दहशतवादी संघटनांशी संबंध होते. त्यांची शस्त्रास्त्र तस्करी, भारतात दहशतवादी हल्ल्याचे प्लॅनिंग याविषयीची महत्वपूर्ण माहिती अतीक अहमद पोलीस तपासामध्ये देणार होता. तशी कबुली त्याने तपासात दिली होती.
त्याचबरोबर पंजाब सीमेवर शस्त्रास्त्रांची तस्करी कुठे होते??, ती शस्त्रे नेमकी कुठे ठेवली जातात??, त्याचे एजंट नेमके कोण आहेत?? हे प्रत्यक्ष पंजाब सीमेवर जाऊन पोलीस आणि सैन्य अधिकाऱ्यांना दाखविण्याची तयारी अतीक अहमदनगर दाखविली होती.
अतीक अहमद एक प्रकारे पोलिसांना आणि भारतीय सैन्य अधिकाऱ्यांना माहिती देऊन दहशतवादी कारवायासंदर्भात माहिती देऊन मोठे पर्दाफाश करण्याची शक्यता होती. दरम्यानच्या काळात तीन जणांनी पोलिसांच्या गाड्यांच्या ताब्यात मीडियाकर्मी म्हणून घुसून अतीक अहमद या दोघा माफियांची निर्घृण हत्या केली आहे.
End of terror in Prayagraj; Atiq Ahmed, Ashraf Ahmed brutally killed by three
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत भीषण स्फोट
- जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला, भाषणादरम्यान झाला स्फोट
- Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ; १७ एप्रिलपासून सुरू होणार नोंदणी
- गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का, सुरतमधील ‘आप’चे सहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल!