नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे रविवारी रात्री उशीरा झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामाच्या परिगाम भागात झालेल्या या चकमकीदरम्यान एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. मात्र सुरक्षा दलांनी घराला चारही बाजूंनी घेरले आणि दोन दहशतवाद्यांना ठार केले. Encounter between security forces and terrorists in Jammu and Kashmirs Pulwama two terrorists killed
सुरक्षा दलांना रविवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास परिगम नीवा परिसरात दोन ते तीन दहशतवादी दिसल्याची माहिती मिळाली होती. तसेच, त्यांच्याकडे स्वयंचलित शस्त्रेही असल्याचे सांगण्यात आले होते. माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. ज्याचे काही वेळातच चकमकीत रूपांतर झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी गावाला वेढा घालायला सुरुवात केली, तेव्हाच एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांना पाहिले. तेथून पळून जाण्यासाठी दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड फेकले आणि त्यानंतर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी स्वत:ला वाचवत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. या गोळीबाराचे चकमकीत रूपांतर झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या लपून बसलेल्या घरांमधुन अनेक लोकांना बाहेर काढले आणि सुरक्षित स्थळी नेले. जेणेकरून चकमकीदरम्यान कोणाचेही नुकसान होणार नाही. त्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणाला पूर्णपणे वेढा घातला. यादरम्यान रात्री उशिरा दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, दोन्ही दहशतवाद्यांच्या मृत्यूला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
Encounter between security forces and terrorists in Jammu and Kashmirs Pulwama two terrorists killed
महत्वाच्या बातम्या
- लडाखमध्ये भीषण रस्ते अपघात, 9 सैनिक ठार; एक जखमी, कियारी शहराजवळ लष्कराचे वाहन खड्ड्यात पडले
- द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर
- द फोकस एक्सप्लेनर : भाजपच्या पसमांदाच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची रणनीती, काय आहे ‘जय जवाहर-जय भीम’ फॉर्म्युला?
- इम्रान खान यांना आणखी एक मोठा धक्का, सर्वात जवळचे नेते शाह मेहमूद कुरेशी यांनाही अटक!