• Download App
    रोजगार वाढला, नवीन नोकरभरतीला वेग, ऑगस्ट महिन्यात २.७८ लाख नव्या नोकऱ्या|Employment increased, new recruitment accelerated, 2.78 lakh new jobs in August

    रोजगार वाढला, नवीन नोकरभरतीला वेग, ऑगस्ट महिन्यात २.७८ लाख नव्या नोकऱ्या

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेने आता भरारी घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे नवे रोजगार निर्माण होऊ लागले असून ऑगस्ट महिन्यात रोजगारात २६ टक्केवाढ झाली आहे. २.७८ लाख लोकांना नवीन रोजगार संधी मिळाल्या आहेत.Employment increased, new recruitment accelerated, 2.78 lakh new jobs in August

    बेंगळूरु येथील एक्सफेनो या नोकरभरती सहाय्यक कंपनीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात झालेल्या नोकरभरतीमध्ये पूर्ण वेळ नोकºयांचे प्रमाण ९४ टक्के आहे. गेल्या वर्षी जून-जुलैनंतर वार्षिक आधारावर ऑगस्ट २०२० पासून नोकरीच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.



    जून-जुलै २०२० मध्ये अनुक्रमे १.३२ लाख आणि १.४२ लाख रोजगार संधी निर्माण झाल्या होत्या. उत्साहवर्धक बाब म्हणजे, यंदाच्या ऑगस्टमधील एकूण २.७८ लाख रोजगार संधींमध्ये, २.६० लाख लोकांना पूर्णवेळ रोजगाराची संधी मिळाली आहे. याआधी सर्वाधिक चांगली कामगिरी ही जुलै २०२१ मध्ये २.७ लाख नोकऱ्या आणि मार्चपूर्वी २.६७ लाख लोकांना रोजगार उपलब्धतेतून झाली आहे.

    उद्योजकांमध्ये आत्मविश्वास वाढल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. उद्योग आता पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे, असे एक्सफेनोचे सह-संस्थापक कमल कर्नाथ म्हणाले.
    नोकरीविषयक संकेतस्थळ असलेल्या इनडीड.कॉमने दिलेल्या माहितीनुसार, नोकरभरती प्रक्रिया पुन्हा एकदा कोरोनापूर्व म्हणजेच फेब्रुवारी २०२० च्या पातळीवर आहे. टाळेबंदीनंतर ज्या क्षेत्रात सर्वप्रथम शिथिलता आणली गेली आहे अशा क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

    उद्योग क्षेत्रामध्ये मार्चपासून निश्चितपणे गती निर्माण झाली आहे. कोरोना साथीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेल्या १५ महिन्यांत, माहिती तंत्रज्ञान, उत्पादन निर्माण आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आशादायी वातावरण निर्माण झाले आहे आणि या क्षेत्रात नोकरदारांच्या शोधात असलेल्या कंपन्यांची अर्थात आपल्या ग्राहकांची संख्या चार टक्क्यांनी वाढली आहे, असे क्वेस कॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मोराजे यांनी सांगितले. अजूनही किराणा क्षेत्र, हॉटेल आणि विमान सेवा क्षेत्राने वेग पकडलेला नाही.

    टाळेबंदीत शिथिलतेने ऑगस्टमध्ये घरकाम करणारे, काळजीवाहक (केअर टेकर), व्यवस्थापक, सुरक्षारक्षक आणि सफाई कामगारांच्या मागणीतदेखील ६० टक्के वाढ झाली आहे. अन्न आणि किराणा क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संख्येतही अनुक्रमे ५२ टक्के आणि ३९ टक्के वाढ झाली. मनुष्यबळ आणि वित्त क्षेत्रात भूमिकांची मागणी प्रत्येकी २७ टक्यांनी वाढली आहे.

    डिजिटलायझेशन वाढल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील नोकºयाांमध्ये वार्षिक आधारावर १७ टक्के वाढ झाली आहे. या क्षेत्रात प्रकल्प प्रमुख, अभियंता यासारख्या भूमिकांसाठी नोकरीच्या संधींमध्ये ८ ते १६ टक्के वाढ नोंदवण्यात आली. कर्नाथ यांच्या मते माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून आणखी १.५ लाखांहून अधिक नोकऱ्या येत्या काळात खुल्या होतील. इतर क्षेत्रांत वर्षभरात सुमारे २.५ लाखांहून अधिक संधी उपलब्ध होण्याची आशा आहे.

    Employment increased, new recruitment accelerated, 2.78 lakh new jobs in August

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!