वृत्तसंस्था
मुंबई : चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वैद्यकीय चाचणीत ही बाब समोर आली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असून डायलिसिसही सुरू आहे. दैनिक भास्करशी बोलताना ते म्हणाले की, मी स्वस्थ नाही. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. माझी औषधोचार सुरु आहेत. काही दिवसांपासून ते त्यांच्या ऑफिसला सुद्धा जात नव्हते असे त्यांच्या ऑफिसमध्ये लोकांनी सांगितले आहे. Eminent filmmaker Shyam Benegal’s kidneys fail; Start treatment
श्याम बेनेगल यांनी झुबैदा, द मेकिंग ऑफ द महात्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हीरो, मंडी, आरोहण, वेलकम टू सज्जनपूर यांसारखे डझनभर उत्तम चित्रपट बनवले आहेत. श्यामनी 1974 मध्ये आलेल्या अंकुर या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. तर त्यांनी 24 चित्रपट, 45 माहितीपट आणि 1500 जाहिरात चित्रपट बनवले आहेत. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना 1976 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याशिवाय त्यांनी 8 राष्ट्रीय पुरस्कार मिळविले. सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्याचा विक्रम त्यांनी त्यांच्या नावावर केला आहे. 2005 मध्ये त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 1991 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. श्याम बेनेगल हे गुरु दत्त यांचे चुलत भाऊ. श्याम सुंदर बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी हैदराबादमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबीयात झाला. श्यामच्या वडिलांना स्टिल फोटोग्राफीची आवड होती.
श्याम हे अनेकदा मुलांचे फोटो काढायचे. अर्थशास्त्रात एम.ए त्यानंतर ते फोटोग्राफी करू लागले. ‘अंकुर’ हा पहिला चित्रपट बनवण्यापूर्वी त्यांनी अँड एजन्सीसाठी अनेक अँड फिल्म्स बनवल्या होत्या. चित्रपट आणि जाहिराती बनवण्यापूर्वी श्याम कॉपी रायटर म्हणून काम करायचे.
चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांनी त्यांच्या आगामी बायोपिक चित्रपट ‘मुजीब – द मेकिंग ऑफ अ नेशन’चा ट्रेलर रिलीज केला आहे. यासोबतच लोक या ट्रेलरवर टीका करत आहेत. चित्रपटाबाबत योग्य संशोधन झाले नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. मुजीबला भारत आणि बांगलादेश सरकारने संयुक्तपणे बनवले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नाही.
Eminent filmmaker Shyam Benegal’s kidneys fail; Start treatment
महत्वाच्या बातम्या
- स्वयंघोषित काँग्रेस युवराजाने सर्व मर्यादा ओलांडल्या!, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी घेतला राहुल गांधींचा समाचार
- ओवैसींना बी टीम म्हणून हिणवताना पवारच बनलेत का भाजपची बी टीम??
- रामचंद्र पौडेल नेपाळचे नवे राष्ट्रपती; १७ वेळा पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत झाले आहेत पराभूत
- उद्धव ठाकरे यांना बजेटवर बोलायला लावून अजितदादांनी कुणाला मारला डोळा??