वैमानिकाने तातडीने एटीसीला याची माहिती दिली आणि…
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंडिगो विमानाचे दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. दिल्ली-डेहराडून मार्गावरील विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. Emergency landing of IndiGo flight at Delhi Airport
विमानात १५० प्रवासी होते. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान तातडीने उतरवण्यात आले. इंडीगो विमानाने दिल्लीहून उत्तराखंडची राजधानी डेहराडूनला दुपारी तीन वाजेच्या सुमारास उड्डाण केले, मात्र काही वेळाने विमान परतले.
प्राप्त माहितीनुसार, इंडिगोचे विमान दिल्लीहून डेहराडूनला निघाले असता विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. वैमानिकाने तातडीने एटीसीला याची माहिती दिली आणि प्राधान्याने लँडिंग करण्याचे आवाहन केले. त्यावर, विमान तातडीने दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानांमध्ये बिघाडाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. इंडिगोच्या विमानाचे उड्डाण झाल्यानंतर लगेचच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची ही याच महिन्यातील दुसरी घटना आहे.
Emergency landing of IndiGo flight at Delhi Airport
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यासाठी न्यूयॉर्कला पोहोचले; भारतीय समुदायाकडून जल्लोषात स्वागत
- नव्या शैक्षणिक धोरणानुसार निर्माण होत असलेल्या पाठ्यपुस्तकांबाबत धर्मेंद्र प्रधान यांची विशेष माहिती
- ‘’…हे लक्षात आल्यानेच उद्धव ठाकरे बावचळल्यासारखे बोलताय’’ फडणवीसांनी लगावला टोला!
- 18 जुलै हाच खरा गद्दार दिन!!; आमदार संजय शिरसाट असे का म्हणाले??