विशेष प्रतिनिधी
दुबई – दुबईमार्गे भारतात पाठविले जाणारे वैद्यकीय साहित्य कोणताही मोबदला न घेता विमानातून नेले जाणार असल्याचे संयुक्त अरब अमिरातीमधील प्रसिद्ध विमान कंपनी ‘एमिरेट्स’ने जाहीर केले आहे. कंपनीच्या विमानांची भारतातील नऊ शहरांदरम्यान आठवड्याला ६५ उड्डाणे होतात. विमान वाहतूकीचे दर वाढल्याने ‘एमिरेट्स’च्या निर्णयामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांचे पैसे वाचणार आहेत. Emarates fly with free medicines for India
भारतात सध्या कोरोना संसर्गामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याने या देशात तातडीच्या पाठविणे आवश्य्क असलेल्या वैद्यकीय साहित्य आणि औषधांची वाहतूक मोफत करण्याचे एमिरेट्सने आज ट्विटरद्वारे सांगितले.
‘भारताच्या अडचणीच्या काळात सहकार्य करण्यास एमिरेट्स आणि युएई तयार आहेत. त्यामुळेच आम्ही मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्वयंसेवी संस्थांतर्फे भारतात पाठविल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याची आमच्या सर्व मालवाहू विमानांमधून मोफत वाहतूक केली जाणार आहे. भारतातील नऊ शहरांमध्ये जाणाऱ्या विमानांमध्ये ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे,’ असे कंपनीने ट्विट केले आहे.
Emarates fly with free medicines for India
महत्त्वाच्या बातम्या
- कॉँग्रेस २०२४ मध्ये राजकीय पटलावर असेल का? संजय राऊत यांचा सवाल
- अमेरिकेने लपविली कोरोना बळींची संख्या, नऊ लाखांवर मृत्यू झाल्याचे मुख्य वैद्यकीय सल्लागारानेच केले मान्य
- निर्यातीसाठी अच्छे दिन, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्यातीत ८० टक्के वाढ
- लखनऊमध्ये थायलंडच्या कॉलगर्लच्या मृत्यूनंतर अनेक बडे नेते, व्यावसायिक पोलीसांच्या रडारवर
- भारत बायोटेककडून राज्यांना थेट लस पुरवठा, १४ राज्यांमध्ये सुरूवातही
- म्यानमारमधील विद्यापीठांतून अनेक जण निलंबित, लष्करासोबत प्राध्यापक-विद्यार्थ्यांचा संघर्ष