• Download App
    राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला मतदान, निवडणूक आयोगाची माहिती|Elections announced for 56 Rajya Sabha seats; Polling on February 27, Election Commission information

    राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर; 27 फेब्रुवारीला मतदान, निवडणूक आयोगाची माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने 15 राज्यांतून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या सर्व खासदारांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपत आहे.Elections announced for 56 Rajya Sabha seats; Polling on February 27, Election Commission information

    सर्वाधिक रिक्त जागा उत्तर प्रदेशातील (१०) आहेत. याशिवाय बिहार आणि महाराष्ट्रातील 6-6 जागाही रिक्त होत असून, त्यावर निवडणुका होणार आहेत. तसेच पश्चिम बंगाल (5), मध्य प्रदेश (5), गुजरात (4), कर्नाटक (4), आंध्र प्रदेश (3), तेलंगणा (3), राजस्थान (3), ओडिशा (3), छत्तीसगड (1), हिमाचल प्रदेश (1), हरियाणा (1) आणि उत्तराखंड (1) च्या रिक्त जागांवरही त्याच दिवशी मतदान होणार आहे.

    महाराष्ट्रात २८८ आमदार आहेत. त्यामुळे ६ खासदारांसाठी प्रत्येकी ४८ मतांचा कोटा आवश्यक असेल. सध्या भाजपकडे १०४ आमदार आहेत. महायुतीतील मित्रपक्ष शिंदे सेना (४०), अजित पवार गट (४०), भाजप व शिंदेसेना समर्थक २० अपक्ष असे एकूण २०४ हून अधिक आमदारांचे बळ महायुतीकडे आहे. त्यामुळे त्यांचे ४ खासदार सहज विजयी होऊन १२ ते १५ आमदारांची मते शिल्लक राहू शकतात. भाजप, शिवसेना व अजित पवार गटाकडून जोर लावून अजून काही अपक्ष, छोट्या पक्षांची मते मिळवण्याचे प्रयत्न केले जातील. गेल्या वेळी भाजपने काँग्रेसची काही मते फोडली होती. तोच ‘पॅटर्न’ पुन्हा राबवला तर महायुतीचा पाचवा उमेदवारही निवडून येऊ शकतो.

    Elections announced for 56 Rajya Sabha seats; Polling on February 27, Election Commission information

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य