शिवराज सिंह चौहान, कमलनाथ यांच्यासह दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 साठी मतदान उद्या म्हणजेच शुक्रवार, 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभेच्या 230 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. Election for Madhya Pradesh Legislative Assembly on 230 seats tomorrow polling will be held in a single phase
मध्य प्रदेशात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. त्याचवेळी आम आदमी पार्टी, बसपा, सपासह इतर अनेक पक्षही निवडणुकीत हात अजमावत आहेत, त्यामुळे ही लढत अधिक रंजक बनली आहे. निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे.
राज्यातील सर्वच जागा काँग्रेस आणि भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत, मात्र यापैकी सहा जागांवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. ज्यामध्ये छिंदवाडा, दिमानी, चुरहट, दतिया, बुधनी आणि इंदूर-1 यांचा समावेश आहे.
मध्य प्रदेशमध्ये शुक्रवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून, ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. तर नक्षलग्रस्त भागात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.
Election for Madhya Pradesh Legislative Assembly on 230 seats tomorrow polling will be held in a single phase
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये यदुवंशियांबाबत भाजप-आरजेडीमध्ये वादंग!
- म्यानमारमध्ये लष्कराने पुन्हा हवाई हल्ला केला, 5 हजार लोक मिझोरामला पळून आले; 2021च्या सत्तापालटापासून 30 हजार लोकांनी आश्रय घेतला
- बारामतीच्या दिवाळीचे कौतुक पुरे झाले, आता धनगर आरक्षणासाठी उद्या बारामती बंदची हाक
- अमिताभ बच्चन दिवाळखोर झाल्यावर सुब्रत रॉय यांनी दिला होता ‘सहारा’