वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI कडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाइटवर इलेक्टोरल बाँड्सचा डेटा अपलोड केला. अनुक्रमे 337 आणि 426 पानांचा हा डेटा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पाहायला मिळेल. यात सर्व राजकीय पक्षांचे देणगीदार सगळेच बडे उद्योगपती निघाले. त्याला कोणीही अपवाद ठरले नाही. Election Commission uploads SBI-provided data on electoral bonds on its website in compliance with SC directions
इलेक्टोरल बाँड्सद्वारे सर्व राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्यांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड, पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड, मुथूट फायनान्स लिमिटेड, पेगासस प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, वेदांत लिमिटेड, बजाज फायनान्स लिमिटेड, भारती एअरटेल लिमिटेड यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर फिनोलेक्स केबल्स लिमिटेड, लक्ष्मी निवास मित्तल, एडलवाईस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, जीएचसीएल लिमिटेड, जिंदाल पॉली फिल्म्स लिमिटेड, आयटीसी लिमिटेड, वेदांत लिमिटेड यांनीही राजकीय पक्षांना देणग्या दिल्या आहेत. याखेरीज अन्य उद्योगपतींची नावे निवडणूक आयोगाने वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहेत.
Election Commission uploads SBI-provided data on electoral bonds on its website in compliance with SC directions
महत्वाच्या बातम्या
- खरगे म्हणाले- काँग्रेसकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत; खाती गोठवली जात आहे, निष्पक्ष निवडणुका कशा होणार?
- अखंड भारताच्या फाळणीच्या वेळी छळ झालेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी, खिश्चनांच्या नागरिकतेसाठी CAA आणला!!
- 4 माजी मुख्यमंत्री लोकसभेला उतरवणे भाजपला गेले “सोपे”; पण 2 माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना “टाळणे” काँग्रेसला ठरले “अवघड”!!
- अमेरिकन खासदाराने केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, ते पुन्हा PM होतील; त्यांच्या नेतृत्वात भारत खूप प्रामाणिक वाटतो