निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. या वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा अशा वेळी जाहीर केल्या जात आहेत, जेव्हा देशात कोरोना महामारीने पुन्हा एकदा उग्र स्वरूप धारण केले आहे. Election Commission to announce Dates Of Assembly Elections in Uttar Pradesh, Punjab, Goa, Uttarakhand and Manipur at 3.30 pm Today
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. या वर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा अशा वेळी जाहीर केल्या जात आहेत, जेव्हा देशात कोरोना महामारीने पुन्हा एकदा उग्र स्वरूप धारण केले आहे.
तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या मुख्य सचिवांना कोविड लसीकरण जलद करण्यास सांगितले होते. आयोगाने मणिपूरबाबत विशेष चिंता व्यक्त केली. राज्यात पहिल्या डोसच्या कमी टक्केवारीमुळे निवडणूक आयोग खुश नाही.
उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ
दरम्यान, निवडणूक आयोगाने नुकतेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांत उमेदवारांसाठी खर्चाच्या मर्यादेत वाढ केली आहे. आता लोकसभेच्या उमेदवारांना ९० लाख, तर विधानसभेच्या उमेदवारांना ४० लाख रुपये खर्च करता येणार आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, आता लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या राज्यांमधील उमेदवारांना ९० लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे. याआधी ही मर्यादा ७० लाख रुपये इतकी होती. तर दुसरीकडे छोट्या राज्यांमधील उमेदवारांसाठी खचार्ची मर्यादा ५४ लाखांवरून ७५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
यासंदर्भात निवडणूक आयोगाने अधिसूचना काढली असून कोणत्या राज्यासाठी खर्चाची किती मर्यादा आहे, हे नमूद करण्यात आलं आहे. देशभरात येत्या काही महिन्यांत दिवसांत ५ राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत.
यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाबसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या राज्यांसोबतच उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा देखील समावेश आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं सर्व राज्यांमधील प्रचारसभा आवरत्या घेतल्या असून भाजपासह इतरही काही पक्षांनी आपल्या प्रचारसभांवर मर्यादा घातल्या आहेत.
तथापि, अलीकडे देशात कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. अशा स्थितीत निवडणूक पुढे ढकलण्याची चर्चाही काही लोकांकडून केली जात होती. निवडणूक पुढे ढकलण्यात येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. गेल्या आठवड्यात मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी लखनौ येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, उत्तर प्रदेशातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आम्हाला भेटले आहेत. सर्व पक्ष कोविड प्रोटोकॉलचे पालन करून वेळेवर निवडणुका घेण्याच्या बाजूने आहेत. कोणत्याही पक्षाने निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केलेली नाही.
Election Commission to announce Dates Of Assembly Elections in Uttar Pradesh, Punjab, Goa, Uttarakhand and Manipur at 3.30 pm Today
महत्त्वाच्या बातम्या
- GOOD NEWS : Atal Pension Scheme- खुशखबर ! केंद्र सरकारची हमी – नाही पडणार पैशांची कमी ! पती-पत्नी दोघांनाही मिळणार दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत पेन्शन
- सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीला झाली कोरोणाची लागण
- मुंबई : महापुरुषांच्या पुतळ्यांच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत्री उभारा ; शिवसेनेने महापालिकेकडे केली मागणी