• Download App
    Election Commission targets LGP

    पशुपती पारस यांना निवडणूक आयोगाचा दणका, लोजपचे निवडणूक चिन्ह गोठवले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने लोकजनशक्ती पक्षाचे बंगला हे निवडणूक चिन्ह गोठविले आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय केंद्रात मंत्री असलेल्या पशुपती पारस यांच्यासाठी मोठाच धक्का आहे. Election Commission targets LGP

    रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पासवान कुटुंबीयांमध्ये त्याचप्रमाणे लोकजनशक्ती पक्षातही फाटाफूट होऊन पक्षावरील नियंत्रणावरून वाद सुरू झाला होता. लोकजनशक्ती पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी चिराग पासवान यांचे नेतृत्व झुगारून पशुपती पारस यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली.



    लोकसभाध्यक्षांकडूनही या निवडीला मान्यता मिळाल्यानंतर पारस यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची नियुक्ती करून स्वतःला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर केले. दुसरीकडे, चिराग पासवान यांनीही लोकजनशक्ती पक्षाची कार्यकारिणी बोलावून पारस गटाचे निर्णय पक्षविरोधी असल्याचे म्हणत फेटाळले होते. सोबतच चिराग पासवान यांनी पारस यांच्याआधी निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन निवडणूक चिन्हावर हक्क सांगितला होता.

    निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार तूर्तास बंगला हे निवडणूक चिन्ह पशुपती पारस अथवा चिराग पासवान यांच्यापैकी कोणालाही मिळणार नाही. सद्यःस्थितीत हंगामी उपाययोजना म्हणून दोन्ही गटांना आपल्या उमेदवारांसाठी नवे नाव आणि स्वतंत्र निवडणूक चिन्ह घेता येईल.

    Election Commission targets LGP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जगदीप धनखड यांना भैरोसिंह शेखावत यांच्यासारखे का नाही आले वागता??, भाजपा तरी नवीन भैरोसिंह कुठून आणणार??

    Shinde’s : राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सूचक विधान

    RSS Chief : सरसंघचालकांची मुस्लिम धार्मिक नेत्यांसोबत बैठक; होसाबळेंसह इमाम प्रमुख उमर अहमद उपस्थित