यापूर्वी रविवारी निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांच्याकडून अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत संपूर्ण माहिती मागवली होती Election Commission rejected Jairam Rameshs appeal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील आरोपांचे पुरावे देण्यासाठी काँग्रेस नेते जयराम रमेश यांची एक आठवड्याची मुदत देण्याची विनंती निवडणूक आयोगाने सोमवारी (३ जून) फेटाळली आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर अमित शाह यांनी देशभरातील 150 जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना बोलावल्याचा आरोप जयराम रमेश यांनी केला होता.
निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांना सोमवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस रमेश म्हणाले, “आतापर्यंत ते 150 लोकांशी बोलले आहेत. ही स्पष्टपणे धमकी आहे, यावरून भाजप किती हतबल आहे हे दिसून येते. अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊ नये आणि संविधानाचे पालन केले पाहिजे.”
आदल्या दिवशी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जयराम रमेश यांच्या आरोपांवर कठोरता दाखवत अफवा पसरवणे आणि प्रत्येकावर संशय घेणे योग्य नाही, असे सांगितले.
मतमोजणीपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, “या सर्वांवर (जिल्हा दंडाधिकारी/रिटर्निंग अधिकारी) कोणी प्रभाव टाकू शकतो का? हे कोणी केले ते आम्हाला सांगा. ज्याने हे केले त्याला आम्ही शिक्षा करू… हे योग्य नाही. तुम्ही अफवा पसरवता आणि प्रत्येकावर संशय घेता.”
यापूर्वी रविवारी (२ जून) निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांच्याकडून अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत संपूर्ण माहिती मागवली होती. ECI ने म्हटले होते की, “मतमोजणीची प्रक्रिया हे प्रत्येक RO (रिटर्निंग ऑफिसर) चे कर्तव्य आहे. वरिष्ठ, जबाबदार आणि अनुभवी नेत्याने असे जाहीर विधान केल्याने संशयाची परिस्थिती निर्माण होऊ नये,हे लक्षात ठेवले पाहिजे.”
Election Commission rejected Jairam Rameshs appeal
महत्वाच्या बातम्या
- केजरीवालांचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण; 5 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी; म्हणाले- तुरुंगातून कधी परत येईन माहीत नाही
- निवडणूक आयोगाच्या गाठीभेटी, मागण्यांची सादर केली यादी, प्रत्यक्षात निकालच नाकारायची काँग्रेसची तयारी; भाजपचीही कुरघोडी!!
- पुणे पोर्शे अपघात प्रकरण : ‘गाडी चालवताना खूप नशेत होतो,’ अल्पवयीन आरोपीने दिली कबुली!
- अमित शहांची 150 जिल्हाधिकाऱ्यांशी कथित बातचीत; डिटेल्स शेअर करण्यासाठी जयराम रमेश यांना निवडणूक आयोगाची नोटीस!!