• Download App
    Election Commission of India मतदार यादीतील नावे ऑनलाईन डिलीट होत नाहीत; राहुल गांधींचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले!!

    मतदार यादीतील नावे ऑनलाईन डिलीट होत नाहीत; राहुल गांधींचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातल्या कुठल्याही मतदार संघात कुठल्याही मतदार यादीतून मतदारांची नावे ऑनलाइन डिलीट होत नाहीत, अशा शब्दांमध्ये निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळून लावले. राहुल गांधींनी कथित “हायड्रोजन बॉम्ब” टाकून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर ते मतचोरीच्या प्रकाराला मदत करत असल्याचा आरोप केला होता. मात्र निवडणूक आयोगाने एका ट्विटद्वारे राहुल गांधींचे सगळे आरोप फेटाळले.

    राहुल गांधींनी आजच्या पत्रकार परिषदेत कर्नाटकातल्या आळंद मतदारसंघात 6018 मते परस्पर ऑनलाईन डिलीट झाल्याचा आरोप केला होता. त्यावर निवडणूक आयोगाने कुठल्याही मतदारसंघातली कुठलीही मते ऑनलाईन डिलीट झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर आळंद मतदारसंघात 2023 मध्ये मतदार यादीतून नावे डिलीट करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, त्या संदर्भात तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेत स्वतःहून एफ आय आर दाखल केला होता त्याचा तपास सुरू आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने ट्विट मधून दिली.

    2018 आणि 2023 या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आळंद मतदारसंघातून दोन वेगळ्या पक्षांचे आमदार निवडून आल्याची आठवण निवडणूक आयोगाने करून दिली. 2018 मध्ये भाजपचे सुबद गुत्तेदार निवडून आले होते, तर 2023 मध्ये काँग्रेसचे बी. आर. पाटील निवडून आलेत याकडे निवडणूक आयोगाने लक्ष वेधले.

    Election Commission of India tweets, “Allegations made by Lok Sabha LoP Rahul Gandhi are incorrect and baseless

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Modi : मोदींच्या वाढदिवशी त्यांच्या बायोपिक ‘माँ वंदे’ची घोषणा; ‘मार्को’चा अभिनेता उन्नी मुकुंदन साकारणार भूमिका

    Vote chori : राहुल गांधींचा “हायड्रोजन बॉम्ब” आला; पण कोर्टाची पायरी चढायला घाबरला!!

    EVM : EVMवर आता उमेदवारांचे रंगीत छायाचित्र असेल; मतदारांना सहज वाचता यावे म्हणून नावे मोठ्या अक्षरात असतील