- पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींविरोधात कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी ही नोटीस जारी करण्यात आली आहे.Election Commission issued show cause notice to Aam Aadmi Party
निवडणूक आयोगाने पक्षाला 16 नोव्हेंबरपर्यंत आदर्श आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपावर उत्तर देण्यास सांगितले आहे. आम आदमी पार्टीच्या नॅशनल कॉन्फरन्सला ही नोटीस बजावण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आपचे राष्ट्रीय निमंत्रक आहेत आणि दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे.
निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीसमध्ये म्हटले आहे की, निर्धारित वेळेत उत्तर न मिळाल्यास या प्रकरणात तुमचे म्हणणे काही नाही असे मानले जाईल. याप्रकरणी निवडणूक आयोग योग्य ती कारवाई किंवा निर्णय घेईल.
Election Commission issued show cause notice to Aam Aadmi Party
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसने आदिवासींची कधीच पर्वा केली नाही, तर भाजप…” ; मोदींचं विधान!
- मतस्वातंत्र्याच्या नावाखाली दहशतवादाला चिथावणी देऊ नका; कॅनडियन पंतप्रधानांना भारताने सुनावले!!
- गोविंद बागेतली दिवाळी पूर्वार्धात न आलेल्या अजितदादांभोवती फिरली; उत्तरार्धात शरद पवारांच्या जातीच्या चर्चेभोवती फिरली!!
- 33 % महिला आरक्षण ताबडतोब लागू करण्याची मागणी करण्यात काँग्रेस पुढे, पण प्रत्यक्ष उमेदवारी देण्यात मागे!!