• Download App
    शोलेचा डायलॉग भाजप नेत्याला पडला महागात, २४ तासांत खुलासा करण्याचा आयोगाचा आदेश|election commission gives notice to BJP leader

    शोलेचा डायलॉग भाजप नेत्याला पडला महागात, २४ तासांत खुलासा करण्याचा आयोगाचा आदेश

    विशेष प्रतिनिधी 

    कोलकता : सीतलकुचीमधील हिंसाचाराबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते सायंतन बसू यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यांनी एकाला मारले तर आम्ही चार जणांचा बळी घेऊ असे म्हणताना त्यांनी शोलेतील डायलॉगचा संदर्भ दिला होता.election commission gives notice to BJP leader

    हे वक्तव्य आचारसंहिता, लोकप्रतिनिधित्व कायदा आणि भारतीय दंडसंहितेचा भंग करते असा ठपका आयोगाने ठेवला. हे वक्तव्य म्हणजे बंगाल आणि राज्यातील जनतेला खुली धमकी असल्याचे आयोगाने नोटिशीत नमूद केले आहे.
    बसू यांनी प्रक्षोभक वक्तव्य केले होते.



    ते म्हणाले होते की, मी, सायंतन बसू, तुम्हाला हे बजावण्यास आलो आहे की तुम्ही अकारण आव्हान देऊ नका. आम्ही सीतलकुचीचा खेळ खेळू. त्यांनी आधी सकाळी १८ वर्षांचा आनंद बर्मनला मारले. भाजपच्या शाखाप्रमुखांचा तो भाऊ होता.

    आम्हाला फार वाट पाहावी लागली नाही. त्यांच्यातील चार जणांना यमसदनास धाडण्यात आले. शोले चित्रपटातील हा डायलॉग तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही एक मारलात तर आम्ही चार मारू. सीतलकुची गाव याचे साक्षीदार बनले.

    election commission gives notice to BJP leader

    Related posts

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते

    Lawyer Rakesh Kishor Kumar : CJI वर बूट फेकणाऱ्या वकिलाने म्हटले- घडले त्याबद्दल पश्चात्ताप नाही; नशेत नव्हतो, सरन्यायाधीशांच्या देवाबद्दलच्या विधानाने वाईट वाटले

    World Bank : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील; जागतिक बँकेने जीडीपी वाढीचा अंदाज 6.5% पर्यंत वाढवला