विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाने एकाबाजूला काही राज्यात कहर माजविला असला तरी राजकीय पक्ष मात्र विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी प्रचाराचे रान पेटवत आहेत.Election commission gave signals to all political parties
यावेल कोरोना नियमांना केराची टोपली दाखविली जात आहे. याची आता निवडणूक आयोगाने गंभीर देखल घेतली असून नियमांचे पालन न करणाऱ्या सर्वपक्षीय स्टार प्रचारक आणि नेत्यांना सज्जड दम भरला आहे.
नियमांचे पालन होणार नसेल तर आम्ही या जाहीर सभांवर बंदी घालण्यास मागे पुढे पाहणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. या पत्रामध्ये आयोगाने म्हटले आहे की, मागील काही आठवड्यांमध्ये देशाच्या विविध भागांतील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे.
अनेक नेत्यांच्या सभांमध्ये नियमांचे योग्यपद्धतीने पालन होत नसल्याचे देखील दिसून आले. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून लोक देखील योग्य पद्धतीने मास्क घालत नसल्याचे दिसून आले आहे.
या जाहीर सभांच्या माध्यमातून राजकीय पक्ष हे सर्वसामान्य जनता आणि त्यांचा स्वतःचा जीव देखील धोक्यात घालत असल्याचे आयोगाने म्हटले आहे.आतापर्यंत आसाम, तमिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी आणि
पश्चिाम बंगालमधील निवडणुकीमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. सर्वच राजकीय पक्षांना कोरोना नियमांचे गांभीर्याने पालन करावे असे आयोगाने म्हटले आहे.
Election commission gave signals to all political parties
हे ही वाचा
- कोरोना लसीकरणातही ठाकरे – पवार सरकारच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊतांना दिसला तथाकथित मनूवाद!!
- महाराष्ट्र सरकारची ब्रेक द चेन नियमावलीमध्ये नव्या बदलांचा समावेश; सरकारी, खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा
- रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करा , आरोग्यमंत्री टोपे यांचे कंपन्यांना आवाहन ; ‘एमआरपी’ ही कमी करण्याचा सल्ला
- काँग्रेस – बद्रुद्दीन अजमल यांच्या पक्षाचे एकाच वेळी “हात वर” आणि “खिसे खालीही”!!; २० लोकांचा फेअरमाऊंटमधील निवासाचा खर्च काँग्रेस करणार
- राष्ट्रपती – पंतप्रधानही रूग्णालयात लस घेतात, मग महाराष्ट्रातले नेते कोण लागून गेलेत, की त्यांना घरी जाऊन लस द्यावी!!; मुंबई हायकोर्ट संतापले