भाजप खासदार हेमा मालिनी यांच्यावर केली होती टिप्पणी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप खासदार हेमा मालिनी यांच्याविरोधात अशोभनीय टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. कारवाईचा एक भाग म्हणून आयोगाने सुरजेवाला यांना 2 दिवस प्रचार करण्यास मनाई केली आहे.Election Commission action against Randeep Surjewala in the case of indecent comments
विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने काँग्रेसला निवडणूक प्रचारादरम्यान महिलांचा अपमान करू शकत नाही, असा इशारा दिला होता. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी हेमा मालिनी यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर निवडणूक आयोगाने हे निर्देश दिले होते.
भाजपच्या मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीबद्दल निवडणूक आयोगाने यापूर्वी काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. आता कारवाई करत त्यांना २ दिवस प्रचार करण्यापासून रोखण्यात आले आहे.
Election Commission action against Randeep Surjewala in the case of indecent comments
महत्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी खटल्यात सर्व पक्षकारांना ऑगस्टपर्यंत दिली मुदत!
- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ECI ची कारवाई, 43 दिवसांत कोट्यवधींची रोकड जप्त
- ‘ काहीही झाले तरी मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही’, अमित शाहांची इंफाळमध्ये घोषणा!
- बारामतीत कुठल्याही पवारांचा पराभव झाला, तर असे कोणते आकाश कोसळणार आहे??