• Download App
    अटक, अडवणूक, कट - कारस्थाने; एकनाथ शिंदेंनी सांगितले ठाकरे - पवार सरकारचे कारनामे!! Eknath shinde revealed conspiracies of thackeray - pawar government

    अटक, अडवणूक, कट – कारस्थाने; एकनाथ शिंदेंनी सांगितले ठाकरे – पवार सरकारचे कारनामे!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अटक, अडवणूक, कट – कारस्थाने; एकनाथ शिंदे यांनी सरकार मध्ये राहुन अनुभवले ठाकरे – पवार सरकारचे कारनामे!!, ते सगळे एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत उघडकीस आणले. Eknath shinde revealed conspiracies of thackeray – pawar government

    त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर या भाजपच्या नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकवून त्यांना अटक करायची होती, भाजपचे आमदार फोडून ते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वाटून घ्यायचे होते. ही सगळी कट कारस्थाने ठाकरे – पवार सरकारने चालवली होती. पण अडवणूक करण्याचा अतिरेक झाल्याने आपण उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला होऊन भाजप समवेत गेलो, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.

    एकनाथ शिंदे म्हणाले :

    सध्या आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा विषयाची चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा पुढे आणला. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले होते, असा दावा केला होता. त्याला फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद लांब, साधे मंत्री देखील आदित्यला करणार नाही, असे उत्तर दिले. ते खरंच आहे. माझ्याकडे नगरविकास खाते होते. परंतु माझ्या खात्यात कोणत्याही अधिकाराशिवाय आदित्य ठाकरे यांचा सतत हस्तक्षेप होत होता.

    अनेक वेळा ते नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठका परस्पर होते होते. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या मार्गात उद्धव ठाकरे यांना मी स्पीडब्रेकर वाटत होतो. तसेच उद्धव ठाकरे माझ्याकडून नगरविकास खाते काढून घेण्याचा डाव आखत होते. मला नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाल्यानंतर माझी झेड प्लस सुरक्षा काढून घेतली.

    भाजप पासून बाजूला होताना उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यामुळे त्यांनीच शरद पवारांकडे माणसे पाठवून स्वतःचे नाव सूचवायला सांगितले. उद्धव ठाकरे यांचे नाव शरद पवारांनी सूचविले नव्हते. ते स्वतः उद्धव ठाकरे यांनी माणसे पाठवून पवारांकडून सूचवून घेतले.

    Eknath shinde revealed conspiracies of thackeray – pawar government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!